शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

साठवणूक क्षमतेअभावी भातखरेदी थांबली

By admin | Updated: May 23, 2015 00:36 IST

लिलाव पध्दतीने भात विक्री : उंदिर, घुशींकडून भाताचे नुकसान

रत्नागिरी : गोदामांची साठवणूक क्षमता संपल्यामुळे यावर्षी भात खरेदी करण्यात आली नाही. २०१३-१४ मध्ये खरेदी करण्यात आलेले भात अद्याप तालुका संघाच्या गोदामात पडून आहे. उंदिर आणि घुशींकडून भाताचे नुकसान करण्यात आले आहे. मिलिंगमध्ये अखंड तांदूळ येण्याऐवजी तुकडा होणार आहे. शासनाचे यामध्ये नुकसान होणार असल्याने लिलाव पध्दतीने भात विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.दि महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १६ खरेदी - विक्री केंद्रांवर १९५९ शेतकऱ्यांकडून २४ हजार ४९८.४६ क्विंटल भात खरेदी करण्यात आली होती. शेतकऱ्यांकडून १३१० रूपये प्रतिक्विंटल अधिक दोनशे रूपये बोनस देऊन खरेदी करण्यात आलेला भात मिलिंग प्रक्रिया रखडल्यामुळे अद्याप तालुका संघांच्या गोदामांमध्ये पडून राहिला आहे. भाताला दोन वर्षे झाल्यामुळे भात भरडण्यास योग्य राहिले नाही. मिलिंगवेळी तुकडा पडण्याची शक्यता असून, यामध्ये शासनाचे नुकसान होणार आहे. जिल्हाभरात कुठेही भरडाईकरिता मिलिंग मिल नसल्यामुळे कोल्हापूर किंवा रायगड जिल्ह्यात पाठवावे लागते. मात्र, यावर्षी मिलिंगचा क्विंटलचा दर न ठरल्यामुळे भात पडून राहिले आहे. २०१३-१४चे भात शिल्लक राहिल्यामुळे २०१४-१५ मध्ये खरेदी झालेली नाही. भात पडून राहिल्यामुळे नवीन खरेदी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शिवाय नवीन हंगाम आता पुन्हा सुरू होत आहे. मे अखेरपर्यंत लिलाव पध्दतीने विक्री व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.दि महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे भात खरेदी करण्यात आल्यानंतर संबंधित भात मिलिंग करून आलेला तांदूळ भारतीय अन्न महामंडळातर्फे तांदूळ खरेदी करण्यात येतो. मात्र, एफसीआयने तांदूळ खरेदीच बंद केली आहे. रेशन दुकानामध्ये विक्रीस ठेवण्यात येतो. परंतु दोन वर्षे भात गोदामातून पडून राहिल्यामुळे ते भात प्रोसेसिंगसाठी योग्य राहिलेले नाही. तांदळाचा योग्य दर्जा मिळाला नाही तर वाहतूक खर्चाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळेच भात गोदामाध्ये अद्याप पडून आहे. भाताचा उठाव न झाल्यामुळे लिलाव पध्दतीने विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.एफसीआयने भाताची उचल न केल्यामुळे भात पडून राहिले आहे. जिल्ह्यातील आठ गोदामांतील भातासाठी ई निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, प्रतिसादाअभावी फेरनिविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रभारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी प्रभाकर किल्ले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. साधारणत: नोव्हेंबरमध्ये भात कापणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर ते मार्चपर्यंत भात खरेदी करण्यात येते. २०१४-१५ साठी १३६० रूपये प्रतिक्विंटलला दर निश्चित करण्यात आला होता. शिवाय जिल्ह्याला २५००० क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वीचे भात गोदामामध्ये पडून राहिले आणि गोदामाची साठवणूक क्षमता नसल्यामुळे तालुका खरेदी - विक्री संघाने भात खरेदी करण्यास नकार दिला. परिणामी भात खरेदीची प्रकिया थांबली. हंगामात पिकवलेले भात स्वत:पुरते ठेवून शेतकरी विकून काही पैसे मिळवतात. परंतु खरेदीची प्रक्रियाच थांबल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावर्षी भातपीक घ्यावे वा नाही, या विवंचनेत शेतकरीवर्ग पडलेला दिसून येत आहे. मे महिनाअखेर लिलाव प्रक्रिया झाली तर भात खरेदी सुरू करण्यात येईल. एकीकडे शासन ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवत असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले दिसून येत आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातील पीक वाया गेले तरीही शासन अद्याप नुकसानभरपाई देण्याच्या मन:स्थितीत नाही. त्याचप्रमाणे भातही शेतकऱ्यांकडे अद्याप पडून राहिला आहे. विक्रीबाबात शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांपुढे आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताकडे शासन डोळेझाक करीत असलेले दिसून येत आहे. (प्रतिनिधी) भात खरेदी केंद्र शेतकरीभात१खेड२७५४५३०२दापोली१११९५३.६०३केळशी१५३१०७७.०१४गुहागर१९७१६५९.६०५रत्नागिरी१२२११०५.६०६संगमेश्वर१७२२५०७.६०७लांजा१८१२८.४०८राजापूर१२८१९९४.४०भात खरेदी केंद्र शेतकरी भात९पाचल९३११५६.८०१०चिपळूण११८१९९४.४०११निवळी३१५६०.४०१२मिरवणे१२५२०२१.२०१३आकले४१४४३.६०१४शिरगाव१९०१७८०.४०१५शिरळ११३१५०१.१०१६देवरूख७२९०९.९५