शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर मात; तरी अनेक दिवस रुग्णालयात घ्यावे लागतात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना होऊन गेल्यानंतरही अन्य व्याधींनी ग्रासल्याने अनेकांना कित्येक दिवस रुग्णालयात राहूनच उपचार घ्यावे लागतात. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना होऊन गेल्यानंतरही अन्य व्याधींनी ग्रासल्याने अनेकांना कित्येक दिवस रुग्णालयात राहूनच उपचार घ्यावे लागतात. हृदयविकार, श्वसनाचा त्रास आदी व्याधी पुन्हा उफाळून आल्याने अशा रुग्णांना पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी राहावे लागते. सहव्याधी असलेले तसेच ज्येष्ठ नागरिक यांना पोस्ट कोविडचा त्रास अधिक होत आहे. जिल्ह्यात अशा रुग्णांचे प्रमाण २ ते ३ टक्के आहे.

कोमॉर्बिड किंवा ज्येष्ठ नागरिक यांना पोस्ट कोविडचा धोका असतो. जे उपचारासाठीच उशिरा दाखल होतात, अशांच्या फुप्फुसाला हानी पोहोचते. तसेच मधुमेही, उच्च रक्तदाब असलेले किंवा कोरोनानंतर योग्य खबरदारी न घेतल्यास पोस्ट कोविडचा धोका मोठ्या प्रमाणावर होतो.

त्यातच कोरोनाची लक्षणे दिसत असूनही अनेक जण चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा व्यक्तींच्या फुप्फुसांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आणि त्याची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे श्वसनाचे विकार पुन्हा वाढतात. श्वासोच्छ्वासास अडथळे निर्माण होतात. काहींना दीर्घकाळ ऑक्सिजनवर राहावे लागते.

ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशांच्या हृदयावरही प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे छातीत धडधडणे, छातीत दुखणे, भरल्यासारखे वाटणे आदी लक्षणे कोरोनामुक्त झाल्यावरसुद्धा दिसतात.

नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसू लागताच त्वरित चाचणी करून घेऊन उपचारासाठी दाखल झाल्यास वेळेवर उपचार होतात.

कोरोनातून बरे पण तरीही अनेक त्रास

- कोरोनातून बरे झाल्यानंतर योग्य खबरदारी घेतली नाही, तर अनेक त्रास होण्याचा धोका असतो.

- विशेषत: फुप्फुसांवर घातक परिणाम झाल्यास श्वसनाचा त्रास उद्भवतो.

- हृदयविकाराचाही धोका असतो.

पोस्ट कोविडचा धोका सहव्याधी आणि ज्येष्ठांना

पोस्ट कोविडचा धोका मधुमेह, उच्च रक्तदाब आदी सहव्याधी असलेल्यांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच उपचारासाठी वेळेवर दाखल न होणाऱ्या या रुग्णांना अधिक होतो. श्वासोच्छ्वासाची समस्या, छातीत दुखणे, अचानक धडधडणे, (एरिधिमियस, विकृती) आदी दीर्घकालीन त्रास होतात.

बरे झाल्यानंतर घ्या काळजी

- मास्क, सॅनिटायझरचा वापर, शारीरिक अंतर पाळणे या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.

- गरम पाणी प्यावे, योगासने, प्राणायाम करावा. सिगारेट, मद्य आदी व्यसनांपासून लांब राहावे.

- पुरेशी विश्रांती व झोप घ्यावी.

वेळेवर चाचणी झाली नाही तर उपचाराला विलंब होतो. यातूनच कोरोनाचा आजार गंभीर होतो. कोरोनातून बरे झाल्यावरही फुप्फुसाची हानी मोठ्या प्रमाणावर झाली असेल तर श्वसनाचे आजार वाढतात. हृदयाचे आजारही गंभीर होतात. छातीत धडधडणे, अचानक छातीत दुखणे या विकारांमध्ये वाढ होते. सहव्याधी असलेले आणि ज्येष्ठांना अधिक त्रास होतो. त्यामुळे कोरोना झाल्यानंतरही शासनाच्या नियमांचे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे योग्य प्रकारे पालन करायला हवे.

- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी

डमी क्रमांक : ९१९