शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सहा तक्रारदारांच्या चौकशीचे ‘महानिरिक्षकां’चे आदेश

By admin | Updated: December 22, 2014 00:19 IST

सॅफरॉन प्रकरण : उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तपास

रत्नागिरी : सॅफरॉन कंपनी बंद होण्यास व कोट्यवधींच्या घोटाळ्यास तत्कालीन शहर पोलीस निरीक्षक जबाबदार असून, त्याबाबत चौकशी करण्याची मागणी सहाजणांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कोकण परिक्षेत्र महानिरीक्षकांनी दिले आहेत. तक्रारदार सहाजणांना उद्या, सोमवारी दुपारी १२ वाजता रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी चौकशीसाठी बोलावले आहे.फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १६० नुसार कोकण परिक्षेत्र महानिरीक्षकांनी याबाबतचा आदेश जिल्हा पोलीस विभागाला पाठविला आहे. त्यात म्हटले आहे, की सॅफरॉन फसवणूक प्रकरणास तत्कालीन पोलीस निरीक्षकच जबाबदार आहेत, असे निवेदन सहाजणांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले होते. त्या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. त्यानुसार निवेदन देणाऱ्या सहाजणांची चौकशी करून माहिती घेण्यात यावी. याप्रकरणी चौकशीसाठी त्या सहाजणांना उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी उद्या त्यांच्या कार्यालयात दुपारी १२ वाजता बोलावले आहे. या सहाजणांत स्नेहा पिलणकर, प्रीती विरकर, रूपाली मजगावकर, प्रज्ञा चव्हाण, दिनेश ठिक व दीपक नाचणकर यांचा समावेश आहे. तक्रारदारांनी आपल्या निवेदनात तत्कालीन शहर पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, एक निरीक्षक व दोन हवालदार यांच्यावर सॅफरॉनबाबत ठपका ठेवला होता. याबाबत सॅफरॉन प्रकरणाच्या होणाऱ्या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी) सत्यता तपासली जाणाररत्नागिरी परिसरात शशिकांत राणे याने आपल्या सॅफरॉन कंपनीमार्फत दामदुप्पट रक्कम देण्याच्या योजनांचे प्रलोभन दाखवीत कोट्यवधी रुपयांना येथील गुंतवणूकदारांना गंडा घातला होता. याप्रकरणात राणे यानेच नंतर काही पोलिसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तसेच गुंतवणूकदारांना आपल्या लेटरपॅडवर त्याबाबत काही लेखी मजकूरही दिल्याचा तक्रारदारांचा दावा आहे. त्यामुळे याबाबतची सत्यासत्यता या चौकशीत तपासली जाणार आहे.