शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात ‘अर्जुना’च्या पुरात एकजण गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पावसाने पुन्हा जाेर धरला आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील अर्जुना आणि ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पावसाने पुन्हा जाेर धरला आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून, पुराच्या पाण्याने पुन्हा एकदा राजापूर शहर बाजारपेठेत शिरकाव केला आहे. दरम्यान, तालुक्यातील रायपाटण - गांगणवाडी येथून एक वृद्ध अर्जुना नदी पात्रात वाहून गेल्याची घटना साेमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. विजय शंकर पाटणे (७०, रा. खेड) असे त्यांचे नाव आहे.

तालुक्यात रविवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पुन्हा एकदा पूर आला आहे. पुराचे पाणी बाजारपेठेत शिरण्याच्या शक्यतेमुळे नगर परिषदेने धोक्याची सूचना देणारा सायरन वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील धाऊलवल्ली - आंबेलकरवाडी हा मुख्य रस्ता खचला आहे. कुवेशी येथे वहाळ फुटून वहाळाचे पाणी रवी राजापकर यांच्या घरात घुसून नुकसान झाले आहे. नाटे ठाकरेवाडी येथे वहाळावरून पाणी गेल्याने ठाकरेवाडीचा संपर्क तुटला आहे. शीळ - चिखलगाव मार्गावर पुन्हा एकदा पुराचे पाणी आल्याने हा मार्ग बंद पडला आहे. शहरातील चिंचबांध रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्गही बंद झाला आहे. पुराचे पाणी बाजारपेठेकडे येऊ लागल्याने जवाहर चौकाकडे येणारी एस. टी. वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरातील शिवाजी पथवर पाणी आल्याने नगर परिषदेने सुरक्षा बोट तैनात ठेवली आहे.

दरम्यान, खेड येथून रायपाटण - गांगणवाडी येथे नातेवाईकांकडे आलेले विजय शंकर पाटणे सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान अर्जुना नदीकिनारी गेले हाेते. मात्र, नदीचे पाणी वेगाने वाढल्याने पुराच्या पाण्यात विजय पाटणे वाहून गेल्याचे माहिती पाेलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली. याबाबत राजापूर पाेलिसांना माहिती मिळताच पाेलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शाेध घेण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली.