शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात एका दिवसात सापडले २९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:19 IST

चिपळूण : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी तालुक्यात २९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात वहाळ आरोग्य ...

चिपळूण : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी तालुक्यात २९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात वहाळ आरोग्य केंद्रांतर्गत तब्बल १२ रुग्णांचा समावेश आहे. तर तालुक्यातील एकूण १३५ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तालुक्यात १०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या दोन महिन्यात कोरोनाचा प्रभाव काहींसा कमी झाला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. महिनाभरापूर्वी तालुक्यात अवघे २० रुग्ण अ‍ॅक्टिव्ह होते. मात्र आता या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून गेल्या काही दिवसात हे प्रमाण अधिक वाढले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा तितकाच प्रभाव वाढला आहे. गेल्या तीन दिवसात सलग २४ ते २५ रुग्ण दररोज आढळून येेत आहेत. अशातच सोमवारी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात २९ रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३५ वर पोहोचली असून येथील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा खडबडून जागी झाली आहे.

सध्या शिमगोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस यंत्रणेने अनेक ठिकाणी उत्सव व यात्रेस परवानगी नाकारली तरी काही ठिकाणी साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जात आहे. त्यातच लग्नसराईही सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता प्रशासनाने आधीच व्यक्त केली होती. त्यानुसार सलग रुग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

चाैकट

तालुक्यातील वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या एका गावात लग्नसमारंभ निमित्ताने मुंबईतून आलेली व्यक्ती कोरोनाबाधित असल्याने त्यापासून तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याशिवाय शहरासह तालुक्यात एकूण २९ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यात शिमगोत्सवात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच आहे. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमात गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळून सण साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.