शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

सच्चेपणाला किंमतच नाही?

By admin | Updated: October 12, 2014 00:52 IST

निष्ठावानांची गोची: शिवसैनिकांमधून उमटत आहेत तीव्र प्रतिक्रिया

रत्नागिरी : काल-परवा ज्यांनी ‘जातीयवादी’ पक्ष म्हणून हिणवले, ज्यांनी केवळ विरोधी पक्ष आहे म्हणून प्रत्येक उपक्रमावर टीकास्त्र सोडले, त्यांना केवळ पक्षप्रवेश करताच आमदारकीची आॅफर आणि निष्ठावंतांच्या पाठीत लाथ, हा न्याय कोणता, असा सवाल आता शिवसेनेतूनच केला जात आहे. माजी राज्यमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या राष्ट्रवादीतील फौजेच्या शिवसेना प्रवेशानंतर शिवसेनेतील निष्ठावान कार्यकर्त्यांची गोची झाली असल्याच्या प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून उमटत आहेत.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ज्यांचे भावनिक नाते जुळले होते आणि ज्यांनी त्यांची हयात शिवसेनेसाठी घालवली त्यांना मागे सारुन दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवाराला थेट ‘खुर्चीची’ आॅफर दिल्याबद्दल सेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.शिवसेनेतील एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने लोकमतशी आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पक्षांतराने ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली व त्यांच्याबरोबर जी काही प्यादी शिवसेनेत आली, त्यांचे पारडे आता जड झाले आहे, आम्ही मात्र चार पावले दूर गेलो आहोत. निदान आमची मतं तरी जाणून घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्याने दिली आहे.ज्या हेतूने आणि ज्या निष्ठेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची उभारणी केली आहे, त्यालाच आता हरताळ फासला जात आहे. सामंत यांच्यासोबत असलेली मोठी फौज ही शिवसेनेसाठी कायमचे दुखणे होऊ शकते. ज्यांच्यावर अनेक आरोप आहेत आणि त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त शिवसेनेनेच केले आहेत, त्यांना आता शिवसेनाच आपल्यात सामावून घेते आणि निष्ठावानांना दूर सारते, हा कुठला न्याय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या निवडणुकीत सेनेचा विजय झाला तर केवळ उमेदवार विजयी होईल आणि त्यांचे समर्थक मोठे होतील, पण सामान्य कार्यकर्त्यांचे काय? असा प्रश्न या कार्यकर्त्याने केला. त्यामुळे वरकरणी सारं आलबेल असलं तरीही ‘अंदर की बात कुठ और है’, असंच चित्र सध्या दिसत आहे. (प्रतिनिधी)४एकनिष्ठ शिवसैनिकांचा सवाल४सामंतांच्या उमेदवारीमुळे निष्ठावानांना धक्का४थेट खुर्चीची आॅफर दिल्याने सेनेत तीव्र प्रतिक्रिया ४निष्ठेला फासला जातोय हरताळ ४अंदर की बात कुछ और...४ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून तीव्र भावना ४प्रवेशांनतरचे कवित्व सुरूच...४काय घडणार याकडे लक्षकोणता झेंडा घेऊ हाती?बाळ माने यांना विधानसभा निवडणुकीत दोनवेळा पराभव पत्करावा लागला, तो पराभव का झाला, हे भाजपपेक्षा जास्त शिवसेनेला माहिती आहे. पण तरीही त्यांनी पक्षत्याग केला नाही. उलट ते त्याच पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करत राहिले. त्यामुळे आता ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा सवाल तेकरीत आहेत.