शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीची गस्त महत्त्वाची ठरणार

By admin | Updated: July 15, 2014 23:44 IST

लांजा तालुका : वाढत्या चोऱ्यांचे पोलिसांपुढे आव्हान

लांजा : पावसाला सुरुवात झाली की, मुंबई - गोवा महामार्गावर असणाऱ्या दुकानांमधून चोऱ्यांचे प्रकार वाढतात. सध्या चिपळूण, खेड येथे मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना हे चोरटे आपला मोर्चा लांजाकडे वळवू शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन लांजा पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.पावसाळ्यामध्ये महामार्गावर असणारी दुकाने एका रात्रीत फोडण्यात येतात. गेल्या दोन वर्षांपासून लांजात अशा घटना घडत आहेत. सध्या चिपळूण, खेड येथे झालेल्या चोऱ्या लक्षात घेऊन लांजा पोलिसांनी दक्ष असणे गरजेचे आहे. मागील वर्षी लांजा शहरातील १३ ते १४ दुकाने एकाच रात्रीत फोडून दुकानामधील साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. काही सामान दुकानाबाहेर फेकून दिल्याने पावसामध्ये भिजून त्याचे मोठे नुकसान झाले होते. सध्या चिपळूण, खेड येथे होत असलेल्या चोऱ्या लक्षात घेऊन खबरदारी म्हणून लांजा पोलिसांनी स्थानिक युवकांचे पथक स्थापन केले आहे. त्यांनी रात्रीच्या वेळी आपापल्या विभागात गस्त नियोजन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पोलिसांनीदेखील आपल्या रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करणे गरजेचे आहे, त्यामुळे भविष्यात होणाऱ्या चोऱ्यांना आळा बसू शकतो. त्यासाठी लांजा पोलिसांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये होणाऱ्या चोऱ्यांना पायबंद घालण्याच्या दृष्टीने अगोदरच खबरदारी घ्यायला हवी. लांजा शहरात आतापर्यंत झालेल्या चोऱ्यांचा अद्याप लांजा पोलीस छडा लाऊ शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)