शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रावती एक्स्प्रेस, मस्त्यगंधा एक्स्प्रेस थांब्यासाठी आंदोलन छेडणार : संदेश जिमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : काेकण रेल्वे मार्गावरील नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसला संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी करण्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवरुख : काेकण रेल्वे मार्गावरील नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसला संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. हा थांबा मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाला जागे करण्यासाठी १५ ऑगस्ट राेजी संगमेश्वर येथे उपाेषण करण्यात येणार असल्याची माहिती निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुकचे प्रमुख संदेश जिमन यांनी दिली. या आंदाेलनात संगमेश्वर भागातील १९६ गावांमधील ग्रामस्थ सहभागी हाेणार आहेत. याबाबतचे निवेदन काेकण रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहे.

संदेश जिमन यांनी सांगितले की, आतापर्यंत अनेकदा पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करूनदेखील आमच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे संगमेश्वरातील कोकण रेल्वेचे प्रवासी संतप्त झाले आहेत. त्यात १९६ गावांमधील हजारो स्त्री-पुरुष, आबालवृद्ध, संघटना, संस्था, मंडळे, शेतकरी, कामगार, बेरोजगार तरुण अशा कित्येकांचा समावेश आहे. स्थानिक नेते, पुढारी, राजकीय आणि सामाजिक घटकांचाही या मागणीला पाठिंबा आहे. आता या सगळ्यांनी एकत्र येऊन संगमेश्वर रेल्वे स्थानकात नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्यांना थांबा मिळावा म्हणून एल्गार केला आहे. आम्ही मोजके कार्यकर्ते कोविड-१९चे सर्व नियम पाळून सनदशीर मार्गाने हे उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याविषयीचे निवेदन ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांच्यासह नरेंद्र नितेश मालप, शांताराम टोपरे, संजय म्हापुस्कर, प्रसाद नागवेकर, तेजस सुर्वे, अनंत माईन यांनी दिले. या आंदाेलनासाठी संतोष कांबळे, दीपक पवार, गणपत दाभोलकर, जगदीश कदम, मुकुंद सनगरे, वसंत घडशी, चंद्रकांत भेकरे यांचे सहकार्य लाभले आहे.

------------------------------

संगमेश्वर येथे नेत्रावती, मत्स्यगंधा एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपतर्फे रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.