शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे नेते संशयाच्या फेऱ्यात

By admin | Updated: October 23, 2016 00:28 IST

‘तो’ नेता कोण? : जिल्ह्यात केवळ एकाच विषयाची चर्चा

सुभाष कदम -- चिपळूण -राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील प्रभावी नेते पक्षांतर करणार, अशा प्रकारचे एसएमएस सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले काही दिवस पसरले आहेत. या मेसेजबाबत नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने हे नेते संशयाच्या फेऱ्यात असून, जिल्ह्यात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. नगर परिषद, नगरपंचायत व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण टोकाला पोहोचले आहे. चिपळूण नगर परिषद निवडणुकीचे अधिकार थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार रमेश कदम यांना दिल्याने जिल्हा प्रभारी आमदार भास्कर जाधव व जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यामध्ये नाराजीचा सूर होता. सर्व नेत्यांना एकत्र बसवून निवडणुकीबाबत निर्णय घेता आला असता, परंतु, तसे झाले नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी थेट माजी आमदार कदम यांना अधिकार दिले, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्याच्या सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र देत जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रभारी यांनी स्वतंत्र निवड मंडळ तयार करावे, अशा सूचना दिल्या. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नक्की अधिकार कोणाला, यावरुनच संभ्रम वाढला. अखेर जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी या प्रकरणात आपण पडणार नाही. प्रत्येक तालुक्यातील नेत्यांनी आपापल्या भागातील निवडणुकीची जबाबदारी घेऊन राष्ट्रवादीची सत्ता आणावी, असे आवाहन केले. जिल्हा प्रभारी आमदार जाधव हे या काळात मुंबईत होते. परंतु, त्यांनीही याबाबत मौन धारण केले. दरम्यान, आमदार जाधव भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली होती. अगदी मुहूर्त ठरल्याप्रमाणे याची छातीठोक खात्रीही देण्यात येत होती. परंतु, तसे काहीच घडले नाही. आमदार जाधव यांनी सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ असा पवित्रा घेतला आहे, तर सावर्डे परिसरात जिल्हाध्यक्ष निकम हे शिवसेनेत प्रवेश करणार, असे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविले जात आहेत. अगदी दि. २५ रोजीचा मुहूर्तही ठरल्याचे छातीठोकपणे सांगितले जात आहे. परंतु, निकमही अन्य पक्षात प्रवेश करतील अशी स्थिती आजतरी नाही. यापूर्वी माजी आमदार रमेश कदम हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा आवई उठल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात कदम यांनी पक्ष तर सोडला नाहीच पण त्यांना नगर परिषदेच्या निवडणुकीची सुत्रे मिळाली. आमदार जाधव, माजी आमदार कदम, जिल्हाध्यक्ष निकम यांच्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही अफवा पसरल्या. त्यात फारसे काही तथ्य असेल असे अजिबात नाही. कारण या तिन्ही नेत्यांना राष्ट्रवादी पक्षाने भरभरुन दिले आहे. एखादा निर्णय मनाविरुध्द झाला म्हणून पक्षांतर करण्याइतपतची मानसिकता त्यांच्यात नाही. काहीवेळा काही कार्यकर्ते मुद्दामहून या कंड्या पिकवत असल्याचे निदर्शनास येत आहे. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेला महिनाभर संभ्रमावस्था आहे. नगर परिषद निवडणुकीची सूत्र माजी आमदार कदम यांच्याकडे असली, तरी कदम विरुध्द शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी अशी स्थिती राहणार आहे. त्यामुळे माजी आमदार कदम ही जबाबदारी कशी पार पाडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच चिपळूण नगर परिषदेत राष्ट्रवादी काँगे्रसची सत्ता असली, तरी ही निवडणूक राष्ट्रवादी व कदम गटाला तितकीशी सोपी नाही. अन्य पक्षांबरोबरच स्वकियांशीही त्यांना छुपा सामना करावा लागणार आहे. चिपळूण हा रत्नागिरी जिल्ह्याचा राजकीय आखाडा मानला जातो. येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व अलबेल आहे असे मुळीच नाही. राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी पेटलेल्या या आगीत तेल टाकण्याचे काम केले आहे. त्यामुळे कालपर्यंत वरकरणी शांत दिसणाऱ्या राष्ट्रवादी पक्षात आता धुराचे सावट दिसत आहे. हे ढग असेच राहिले तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला नगर परिषद निवडणूक थोडी कठीण जाईल आणि यशासाठी झुंजावे लागेल.