शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमुळे १० रोजीची राष्ट्रीय लोकअदालत स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई ...

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १० एप्रिल रोजी आयोजित केलेली राष्ट्रीय लोकअदालत पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. येथील जिल्हा न्यायालय, जिल्हयातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

लोकअदालतमध्ये न्यायालयातील दिवाणी प्रलंबित प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, पराकाम्य दस्तऐवज अधिनियमाच्या कलम १३८ची प्रकरणे, वसुली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्रकरणे, कामगारसंबंधीचे निस्तारणीसंबंधीचे दावे, कौटुंबिक / वैवाहिक वादासंदर्भात न्यायालयीन प्रकरणे, भूसंपादन, दिवाणी, किरकोळ दिवाणी अर्ज इत्यादी तडजोडीसाठी ठेवणेत आली होती. त्याचबरोबर या लोकअदालतीमध्ये वादपूर्व प्रकरण म्हणजे विदयुत कंपनी, विविध बँका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणेबाबतची दाखलपूर्व प्रकरणे, तसेच नगर परिषद यांचे विविध विभागाचे थकीत रकमेबाबतची प्रकरणे, वाटपासंदर्भातील दाखल न झालेली प्रकरणे, जमिनीवरील अतिकमणासंदर्भातील प्रकरणे, वैवाहिक वाद ज्यासंदर्भात न्यायालयात कोणताही वाद प्रलंबित नाही, अशी प्रकरणे ठेवण्यात आली होती.

परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. १० रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशीची राष्ट्रीय लोकअदालत पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. पुढील तारीख निश्‍चित होताच त्याची सुचना संबंधितांना देणेत येणार आहे, अशी सूचना वरिष्ठ न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आनंद सामंत यांनी केली आहे.