शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अध्यक्षपदी बुवा गोलमडेंचे नाव

By admin | Updated: February 23, 2016 00:19 IST

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आज

रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होणार असून, शिवसेनेचे बुवा गोलमडे यांचे नाव यासाठी निश्चित झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद हे प्रथमच चिपळूणला मिळणार आहे. तीन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना २५, भाजप ८, राष्ट्रवादी १९, काँग्रेस ३ आणि बविआ २ असे सदस्य निवडून आले होते. सध्या जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल :- शिवसेना - ३०, भाजप - ९, राष्ट्रवादी - १५, काँग्रेस - १ व बविआ - १ असे आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीचे बलाबल असताना केवळ महिला अनुसूचित जातीच्या आरक्षणामुळे पुरेसे पक्षीय बल नसतानाही अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा जाधव यांच्या पारड्यात पडले होते. त्यामुळे अडीच वर्षे युतीला अध्यक्षपदाची प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र, त्यानंतर आमदार राजन साळवी यांचे समर्थक जगदीश राजापकर यांच्या रुपाने लांजा तालुक्याला प्रथमच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद लाभले होते. राजापकर यांचा अध्यक्षपदाचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी जानेवारी, २०१६ शेवटच्या आठवड्यात राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रभारी अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश शेवडे हे कार्यरत आहेत. त्यानंतर लाल दिव्याच्या गाडीसाठी इच्छुकांची धावपळ सुरु झाली होती. माजी आमदार सूर्यकांत दळवी समर्थक जिल्हा परिषद सदस्या स्मीता जावकर आणि चिपळूणचे बुवा गोलमडे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, गेल्याच महिन्यात मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये चिपळूणला अध्यक्षपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे बुवा गोलमडे यांना अध्यक्षपद मिळणार हे निश्चित असल्याने त्यादृष्टीने चिपळूण तालुक्यातील शिवसैनिकांनी जोरदार तयारीही केली आहे. त्यामुळे उद्या शिवसेनेचे गोलमडे यांच्या गळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ पडणार आहे. यामुळे चिपळूण तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (शहर वार्ताहर)