शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाची गाडी हळूहळू रुळांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:31 IST

रत्नागिरी : मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते गोवा या ४५० किलोमीटरच्या मार्गाचे चाैपदरीकरण सुरू आहे. यापैकी इंदापूर ते ...

रत्नागिरी : मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते गोवा या ४५० किलोमीटरच्या मार्गाचे चाैपदरीकरण सुरू आहे. यापैकी इंदापूर ते झाराप हा ३६६ किलोमीटरच्या चाैपदरीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. या दरम्यान मध्यंतरी रखडलेले काम आता हळूहळू मार्गी लागले असून, आता चौपदरीकरणाच्या कामाला वेग येऊ लागला आहे.

महाराष्ट्रातील पनवेल ते झाराप या एकूण ४५० किलोमीटरचे चौपदरीकरण २०१७ सालापासून सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील ३६६.१७० किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चार टप्प्यांत सुरू असून यासाठी ११७४५.९३ कोटी इतका अंदाजपत्रकीय खर्च मंजूर करण्यात आला आहे. या चार टप्प्यांत इंदापूर ते कशेडी ७७ किलोमीटर, कशेडी पायथा ते संगमेश्वर १०४, संगमेश्वर ते लांजा ८६ किलोमीटर आणि राजापूर ते झाराप ९९.१७ किलोमीटर असे एकूण ३६६.१७ किलोमीटरचे चौपदरीकरण सुरू आहे.

कशेडी ते परशुराम घाटापर्यंतचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, परशुराम घाट ते आरवली या ३५.९ किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम केवळ २७ टक्के; आरवली ते कांटे या ४० किलोमीटरचे काम केवळ ८ टक्के आणि काटे ते वाकडे या ५०.९० किलोमीटरचे काम केवळ १२ टक्के झाले आहे. मात्र, वाटूळ ते तळगाव आणि त्यापुढे झारापपर्यंतचे काम सुमारे ९५ ते ९९ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परशुराम घाट ते वाकेड या जिल्ह्यातील चौपदरीकरण करणाऱ्या आधीच्या कंपनीकडून हे काम काढण्यात आले असून, ते नव्या ठेकेदाराकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आता चौपदरीकरणाची गती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रायगड तसेच सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधील महामार्गाच्या चाैपदरीकरणाने गती घेतली आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाचे काम संथ गतीने झाले आहे. त्यामुळे आता ठेकेदार बदलल्यामुळे तरी हे काम पावसाळ्यापुर्वी द्रुतगतीने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चौकट

इंदापूर ते झाराप या ३६६.१७ किलोमीटरच्या चौपदरीकरणात सर्वाधिक २१३ किलोमीटरची लांबी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. रायगड ७० किलोमीटर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लांबी ८२.८७ किलोमीटरची आहे.

चौकट

कशेडी घाटातील बोगद्याचे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रत्नागिरीतील २०५ किलोमीटर लांबीपैकी ७४.९९४ किलोमीटर (डिझाइन लांबी) लांबीचे काम जानेवारी २०२१ अखेर पूर्ण झाले आहे. ५० किलोमीटरचे काम जून २०२१, तर ८८ किलोमीटरचे जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

चौकट

इंदापूर ते झाराप या ३६६.१७ किलोमीटरच्या चौपदरीकरणादरम्यान २४ मोठे पूल असून यांपैकी १२ पूर्ण झाले आहेत. ८५ लहान पुलांपैकी ५२, १५८७ मोऱ्यांपैकी ९११, ७७ अंडरपासरपैकी ३६ पूर्ण झाले असून, उर्वरित प्रगतिपथावर आहे. १.८० किलोमीटरच्या बोगद्यापैकी ०.९ किलोमीटरचा बोगदा पूर्ण झाला असून उर्वरित काम सुरू आहे.

चौकट

इंदापूर ते झाराप या ३६६.१७ किलोमीटरच्या चौपदरीकरणासाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील भूसंपादनाचे क्षेत्रफळ २०१८.३८ हेक्टर असून, त्यापैकी ९७९.२९ हेक्टर क्षेत्र ताब्यात घेण्यात आले असून अजून १०४० हेक्टर संपादित करावयाचे आहे.