शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला ग्राहकांचा ठेंगा, थकबाकी जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:33 IST

रत्नागिरी : लाॅकडाऊनच्या काळातील थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कठाेर निर्णय घेतले हाेते. ही वसुली पूर्ण न झाल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर ...

रत्नागिरी : लाॅकडाऊनच्या काळातील थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कठाेर निर्णय घेतले हाेते. ही वसुली पूर्ण न झाल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री यांनी दिले हाेते. मात्र, ग्राहकांनी थकीत वीजबिल भरण्याबाबत निरुत्साह दाखविल्याने रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही ३४ काेटी ६६ लाख वीज थकबाकी शिल्लक राहिली आहे. या थकबाकीमुळे आता कारवाईच्या भीतीने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

मागील वर्षी २२ मार्चपासून कोरोना एके कोरोना व्यापून राहिला आहे आणि सर्वांचेच स्वत:च्या घरात राहण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. घरी राहणाऱ्या मंडळींना अगदी बाधित झालेल्या परिसरात जीवाची बाजी लावत वीज कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना अविरत वीजपुरवठा सुरू ठेवला.

परंतु, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यावर महावितरण कंपनीने वीज देयके देण्यास सुरुवात केली. परंतु वीज ग्राहकांच्या अडचणींचा विचार करून व एकूणच वीजवापर बराच वाढला असल्याने वीजपुरवठा खंडित न करता हप्त्याने बिल भरण्याची सवलत देण्याचा निर्णय शासनाने आणि महावितरण कंपनीने घेतला होता. सप्टेंबर २०२० पासून सगळ्या वीज ग्राहकांना हप्ते पद्धतीने वीजबिल भरणा करण्याची विनंती केली होती.परंतु, वीज ग्राहकांनी हप्त्याच्या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने थकबाकी सातत्याने वाढत राहिली होती.

अखेर वाढत्या थकबाकीमुळे एकही हप्ता न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा कटू निर्णय १० मार्चपासून ऊर्जामंत्र्यांना घ्यावा लागला होता.

यामुळे केवळ २० दिवसांत पूर्ण थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महावितरण कंपनीसमोर होते. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर काही ठिकाणी हल्लेही करण्यात आले होते. यामुळे थकबाकी वसूल होईल, याची अपेक्षा होती. परंतु, ३१ मार्चअखेर वीज ग्राहकांनी महावितरणला ठेंगा दाखविल्याचे दिसत आहे. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातील ९५,८२८ ग्राहकांची ३४ कोटी ६६ लाख रुपये एवढी थकबाकी शिल्लक आहे. ३१ मार्च संपला तरीही ही थकबाकी वसूल झाली नसल्याने आता कोणती कारवाई होणार, या चिंतेत कर्मचारी पडले आहेत. यामुळेच पूर्ण थकबाकी वसूल होईपर्यंत आता ही मोहीम थांबविली जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.