शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
7
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
8
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
9
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
10
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
11
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
13
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
14
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
15
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
16
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
17
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
18
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
19
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
20
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

‘त्या’ कपंनीविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन

By admin | Updated: December 2, 2014 00:24 IST

तणावपूर्ण वातावरण : अतिक्रमण केले जात असल्याच्या जमीनदारांच्या तक्रारी

सातार्डा : सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीने नियोजित केलेल्या रस्त्याच्या कामासाठी सुरुवात केली असून, रस्त्याचे काम करताना अतिक्रमण केले जात असल्याच्या तक्रारी जमीनदारांनी केल्या आहेत. तरीही जमीनदारांवर दबाव आणण्यासाठी शनिवारी चार पोलीस व्हॅनसह कामाच्या ठिकाणी पोहोचल्याने सातार्डा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. उत्तम स्टीलकडून पोलीस बळाचा वापर करून दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप करून कंपनीच्या मनमानीविरोधात आंदालन छेडण्याचा इशारा जमीनदारांनी दिला आहे. सातार्डा - सातोसे पर्यायी नव्या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेने शर्थी व अटी घालून परवानगी दिली असताना कंपनीने पालन केले नाही. रस्त्याची कायदेशीर मोजणी करून जमिनीतून रस्ता द्यावयाचा असताना जमीनमालकांना विश्वासात न घेता हा विषय महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असताना कंपनी पोलिसी बळाचा वापर करत असल्याचा आरोप जमीनमालक फटू सोनू राऊळ, चंद्रकांत टेमकर, सद्गुरू हरमलकर तसेच मनोहर मेस्त्री यांनी केला असून, याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कपंनीने सातार्डा-सातोसे रस्त्याच्या १२ मीटर रुंदीकरणासाठी नीस न लावल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीत अतिक्रमण करून उत्खनन केल्यामुळे जमिनीचे नुकसान होत आहे. कंपनीने पोलिसी बळाचा वापर करून शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सातार्डा सरपंच उदय पारिपत्ये यांनी पोलिसांना सातार्डा गावामध्ये पोलीस व्हॅन आणण्याचे प्रयोजन विचारले असता पोलीस निरीक्षक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे सरपंच पारिपत्ये यांच्यासह माजी उपसरपंच संदीप प्रभू, जयकुमार पारिपत्ये, नामदेव गोवेकर, बंड्या काले, चंद्रकांत मेस्त्री, मनोहर मेस्त्री यांनी पोलिसांना जाब विचारला. जिल्हा परिषदेने घालून दिलेल्या अटी व शर्थींच्या अधीन राहून कंपनीने रस्त्याच्या जमिनीचा कायदेशीर सर्वे करून, शेतकऱ्यांच्या नुकसानाचा विचार करूनच कामाला सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली. (वार्ताहर)