शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक घरातील कुटुंबांना हलवा

By admin | Updated: June 25, 2015 01:08 IST

पालकमंत्र्यांचे आदेश : पर्यायी घरांची व्यवस्था करून पुनर्वसन करा; दाभोळ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदतीच्या धनादेशाचे वाटप

दापोली : तालुक्यातील दाभोळ टेमकरवाडी येथील इतर धोकादायक घरातील कुटुंबांचे स्थलांतर करून त्यांना तातडीने पर्यायी घरांची व्यवस्था करुन देण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना मदतीचे धनादेशही पालकमंत्र्यांच्याहस्ते देण्यात आले. दाभोळ टेमकरवाडी येथील दरड कोसळलेल्या ठिकाणची पाहणी करुन वायकर यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि स्थलांतर व पर्यायी घरांच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, दापोलीचे उपविभागीय अधिकारी अनिल सावंत, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दाभोळ येथे झालेल्या दुर्घटना टाळण्याच्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील धोकादायक जागांचा शोध घेऊन तेथील माती परीक्षण, नैसर्गिक परिस्थिती आदीचे सर्वेक्षण करावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. या दुर्घटनेप्रसंगी बचाव कार्यात प्रशासनाला केलेल्या मदतीबद्दल स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांचे आभार मानून अशीच सतर्कता दाखवण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी त्यांना बचाव कार्याची माहिती दिली. आपद्ग्रस्तांना प्रशासनाकडून तत्काळ मदत करण्यात येत असून, आपद्ग्रस्त कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याबरोबरच त्यांना रेशनिंगसारख्या अत्यावश्यक बाबींचा पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच धोकादायक कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करताना ग्रामस्थांची अडचण जाणून घेऊन पडताळणीअंती जागा देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी) पालकमंत्र्यांकडूनही मदत दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारसांना वायकर यांच्या हस्ते प्रत्येकी ४ लाख रूपयांच्या मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच शासनाव्यतिरिक्त पालकमंत्र्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून घराचे पूर्णत: नुकसान झालेल्या ३ व्यक्तींना प्रत्येकी २५ हजाराचे, अंशत: नुकसान झालेल्या २ व्यक्तींना प्रत्येकी १० हजाराचे व जखमींना औषधोपचारासाठी प्रत्येकी ५ हजाराचे आर्थिक सहाय्य केले.