शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पैशाने खुर्ची मिळवता येते ज्ञान नाही : संजय यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST

लांजा : पैशाच्या जोरावर नगराध्यक्षांनी खुर्ची मिळवली, तर लग्न होत नाही म्हणून आमदारांकडून बालहट्ट करून उपनगराध्यक्षांनी खुर्ची मिळवली. या ...

लांजा : पैशाच्या जोरावर नगराध्यक्षांनी खुर्ची मिळवली, तर लग्न होत नाही म्हणून आमदारांकडून बालहट्ट करून उपनगराध्यक्षांनी खुर्ची मिळवली. या खुर्चीचा उपयोग वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यासाठी न करता जनतेच्या विकासकामांसाठी करायला हवा होता, असा सनसनाटी टोला भाजपचे नगरसेवक व गटनेते संजय यादव यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे नावे न घेता लगावला आहे.

लांजा नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील जातीवाचक वाड्यांची व रस्त्यांची नावे बदलण्याचा अध्यादेश वाचून त्यावर नगरसेवकांनी प्रमुख गावकरी मंडळींना विश्वासात घेत नावात बदल करण्याचा निर्णय सर्वसाधारण बैठकीत घेतल्यानंतर भाजपचे नगरसेवक व गटनेते संजय यादव यांनी वाड्या व रस्त्यांच्या नावात बदल करण्याला विरोध करत जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी उत्तर दिल्यानंतर भाजप नगरसेवकांनी नगराध्यक्षांवर टीका केली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी जनतेशी चर्चा करून पुढील सभेमध्ये विषय घेण्यात यावा, अशी विनंती केली होती. परंतु, दि. २८ ऑगस्ट रोजी सत्ताधारी शिवसेनेने धुंदरे प्रभागातील सुतारवाडीचे नामकरण साईनगर करण्याची कार्यवाही करण्यासाठी पत्र दिले. ही गोष्ट लांजातील गाववाल्यांना विचारात न घेता केली, असे संजय यादव यांनी म्हटले आहे. पॅनकार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड, बँक, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे व इतर दफ्तरी ऐवज यावरील नोंद असलेल्या पत्त्यात बदल करण्यासाठी गाववाल्यांना किती परिश्रम घ्यावे लागतील, याचा अभ्यास नसल्याने ‘फक्त नामकरण करणे म्हणजे विकास नाही’ असा टाेलाही त्यांनी लगावला आहे.

जनतेला खोटे सांगू नका, जर तुम्ही नाव दिले नाहीत तर शासन आपल्या प्रभागाला वाडी-वस्तीला नाव ठरवेल, असे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करणे चुकीचे आहे. खरंच जर सत्ताधारी शिवसेना जनतेसोबत असेल तर त्यांनी जाहीर करावे की, आम्ही लांजा नगर पंचायत कार्यक्षेत्रातील कोणतीही नावे बदलणार नाही किंवा बदलू देणार नाही. पण असे ते करणार नाहीत. कारण ती क्षमता त्यांच्यात नाही, असे मत संजय यादव यांनी मांडले. यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, नाना शेट्ये, हेमंत शेटे, विजय कुरूप, मयूर शेडे, अशोक गुरव, शेखर सावंत, नगरसेवक मंगेश लांजेकर, शीतल सावंत, इक्बाल गिरकर उपस्थित होते.