शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

अनुदानित सिलिंडरच्या लाभासाठी आता मार्चची डेडलाईन

By admin | Updated: December 23, 2014 00:54 IST

राधाकृष्णन बी. : आधारकार्ड आता पुन्हा सक्तीचे होणार

रत्नागिरी : गॅसधारकांना बारा गॅस सिलिंडर अनुदानित किमतीने मिळण्यासाठी सुधारित थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेची अंमलबजावणी १ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. अजूनही ज्यांनी आधारकार्ड वा बँक खात्याचा खात्याचा क्रमांक गॅस एजन्सीला संलग्न केल्या नसल्यास तो त्वरित करून घ्यावा. सद्यस्थितीत त्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असले तरी अशा ग्राहकांसाठी ३१ मार्च २०१५ ही ‘डेडलाईन’ ठरवून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अनुदानित गॅस सिलिंडरचे अनुदान बँकेत जमा होण्यासाठी गॅसधारकांना गतवर्षी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले होते. मात्र, आधारकार्डच्या नोंदणीत अडचणी आल्याने ही थेट लाभ हस्तांतरण योजना राबविताना अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने आता या योजनेत सुधारणा केली आहे. आता ग्राहकांना १२ही सिलिंडर सवलतीच्या दराने मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी ज्यांची आधारकार्ड नोंदणी अद्याप झालेली नाही वा ज्यांचे बँक खाते अद्याप गॅस एजन्सीशी संलग्न नाहीत, त्यांनी ती मार्चअखेरपर्यंत यापैकी एकतरी पुरावा संलग्न करावा लागणार आहे. त्यांना अनुदानित सिलिंडरचा लाभ मिळेल. मात्र, ३१ मार्चनंतर आधारक्रमांक वा बँक खाते क्रमांक एजन्सीशी संलग्न न झाल्यास त्यांना एप्रिल ते जूनपर्यंत बाजारभावाने सिलिंडर घ्यावा लागेल. जूनमध्ये त्यांनी आधारक्रमांक संलग्न केल्यास एप्रिल ते जूनपर्यंतचे अधिक भरलेले पैसे त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतील. जूननंतरही आधारक्रमांक व बँक खाते संलग्न केल्याशिवाय त्या ग्राहकांना ‘डीबीटी’ योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती यावेळी पुरवठा अधिकारी नीता शिंदे यांनी दिली. गॅसधारकांनी आपले खाते राष्ट्रीयीकृत बँकेत उघडून तो क्रमांक आपल्या गॅसएजन्सीकडे द्यावा, तसेच आधारकार्ड नोंदणीसाठी जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्रांत सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील एकूण २ लाख २३ हजार ७२७ ग्राहकांपैकी आधारनोंदणी १ लाख ४६ हजार २७० (६५.४० टक्के) ग्राहकांनी केली असून बँकेचे खाते तसेच आधारक्रमांक संलग्न असलेल्या ग्राहकांची संख्या ५१.५३ टक्के इतकी असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)