शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यात काजू बागा जळून लाखोंची हानी

By admin | Updated: February 13, 2015 00:53 IST

मुर्तवडे येथील प्रकार : तलाठी नॉटरिचेबल; मात्र कृषी सहाय्यक रिचेबल

चिपळूण : तालुक्यातील मुर्तवडे गावी मंगळवारी लागलेल्या आगीत काजूच्या बागा भस्मसात झाल्या. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असता तलाठी पाटील ‘नॉटरिचेबल’ होते, तर कृ षी सहाय्यक काळे यांनी तत्परता दाखवून शेतकऱ्यांना दिलासा दिला.पातेपिलवली गावाकडून मंगळवारी सायंकाळी ६ च्या दरम्याने धुरांच्या लोळासह आगीचा वणवा मुर्तवडे - बौद्धवाडीच्या दिशेने आला. यावेळी अंधार दाटल्याने वणवा विझवणे अडचणीचे झाले. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत उपसरपंच अशोक राजाराम पवार व त्यांचे भाऊ व शंकर सोनू पवार यांच्या १५ वर्षापुर्वी रोजगार हमी योजनेतून लावलेल्या काजूची लागवड आगीच्या भक्षस्थानी पडल्या . अशोक पवार यांची १०० हून अधिक तर शंकर यांची ७० ते ८० लागती काजूची झाडे जळून खाक झाली. त्या मुळे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.याबाबत पुढे कोणती कार्यवाही होणार इकडे लक्ष लागले आहे.वणव्यामुळे अनेक बागाही होरपळल्या असून त्यांचेही नुकसान झाले आहे. वणव्यात भस्मसात झालेल्या बागांचा पंचनामा करण्यासाठी शेतकरी तलाठ्याशी संपर्क साधत होते. मात्र संपर्क होत नव्हता. दोन दिवस तलाठी न भेटल्याने अखेर मंडल अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे भागात लागलेल्या वणव्यात काजू बागांचे मोठे नुकसान झाले असून पंचनामा झाल्यानंतर याबाबतची मदतीची कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)वणवे लावून आंबा, काजूच्या बागांबरोबरच इतरही अनेक वनस्पतींची हानी केली जाते. सागासारखी लागवडही वाया जाते. अनेक औषधी वनस्पती, नैसर्गिक जैवविविधताही नष्ट केली जाते. ही हानी थांबण्यासाठी आता शासन पातळीवरच कठोर निर्णय व्हायला हवा. गावात कटूता नको, वाद नको म्हणून कोणी बोलत नाही. त्यातून सार्वजनिक व राष्ट्रीय संपत्तीचेच नुकसान होत आहे. हे थांबवून, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळायला हवी.- अशोक पवार, उपसरपंच, ग्रामपंचायत मुर्तवडे