शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मनमानी चालकांमुळे तोटा

By admin | Updated: November 10, 2014 23:56 IST

एस. टी.तील त्रुटी : खेडच्या कारभारावर प्रवासी नाराज

दिनकर चव्हाण -आंबवली -दिवसागणिक तोट्यात सुरू असलेली एस. टी. आता विविध समस्यांनी ग्रासली आहे़ ती नफ्यात आणण्यासाठी आता एस. टी. महामंडळाने नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, एका बाजूला हे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला एस्. टी. चालकांच्या मनमानीमुळेच अनेक प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे आणि त्याकडे एस्. टी. प्रशासन डोळेझाक करीत आहे. अशातच महामंडळाच्या उदासीनतेमुळे जुन्या योजनांच्या जागी नव्या योजना आणून एस्. टी.ला आणखीनच खाईत लोटण्याचे प्रयत्न तर होत नाही ना, असा संभ्रम निर्माण झाला आहे़ खेड तालुक्यातील बहुतेक मार्गावर धावणाऱ्या एस. टी. बसेस दिलेल्या थांब्यावर थांबत नाहीत. काही वेळा तर एस. टी. रिकामी असली तरीही प्रवासीवर्गाला अनेक कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागते. बहुतेक थांब्यांवर एस. टी. थांबत नाही. यापूर्वी ‘हात दाखवा गाडी थांबवा’ अशी एस. टी.ची मोहीम होती. त्याद्वारे प्रवासी संख्या वाढली व अनेक प्रवाशांची सोय झाली होती. मात्र, एखादी योजना यशस्वी झाली की, अचानक बंद करण्यात येते. त्याचा फटका गावोगावी जाणाऱ्या एस. टी.ला बसत आहे. अनेक ठिकाणी हात दाखवूनही गाडी न थांबल्याने प्रवासीवर्गाची गैरसोय होत आहे. ज्येष्ठ नागरिक एस. टी.च्या अनेक सवलतींचा फायदा घेतात. मात्र, त्यांना अनेकवेळा एस. टी. आवश्यक तेथे थांबविण्यात येत नसल्याने फटका बसत आहे. काही ठिकाणी एस. टी.च्या योजनांची पुन्हा सुरूवात करण्यात येत आहे. मात्र, तोट्यात येत असलेल्या एस. टी.ला अनेक योजना यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मदत घेणे आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षांत खेड बस स्थानकातील उभ्या असलेल्या एस. टी. बसमध्ये चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत़ पाकिटमार तसेच महिला प्रवाशांची पर्स चोरी आणि गळ्यातील मंगळसुत्राची चोरी होणे, असे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत़ या चोरीच्या प्रकरणातील एकाही आरोपीला आजवर शिक्षा झाली नाही़ मात्र, चालकांच्या मनमानीपणामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. एस. टी.ने परिश्रमपूर्वक त्रुटी दूर कराव्यात, अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवासीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.