शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
5
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
6
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
8
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
9
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
10
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
11
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
12
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
13
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
14
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
15
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
16
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
17
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
18
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
19
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
20
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले

मंडणगडात वडापकडून होतेय प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 00:41 IST

प्रवासीवर्गात संताप : एस. टी.पेक्षा दीडपट भाडे

देव्हारे : मंडणगड तालुक्यामध्ये वडाप वाहतूक करणाऱ्यांकडून प्रवाशांची लूट होत आहे. त्यामुळे प्रवासीवर्गांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंडणगड ते बाणकोट मार्गावरील हे वडापवाले बाणकोट ते मंडणगड या प्रवासासाठी पन्नास ते साठ रूपये प्रवाशांकडून घेतात तर देव्हारे ते मंडणगड हे एस. टी.चे अठरा रूपये भाडे आहे. मात्र, वडापवाल्यांकडून हेच भाडे पंचवीस रूपये घेण्यात येते. एखाद्या प्रवाशाने जादाचे भाडे देण्यास विरोध केला, तर त्याला हे वडापवाले दमदाटी करत असल्याची चर्चा आहे. मंडणगड ते बाणकोट मार्गावर ही अवैध वाहतुक सुरू असून, याकडे एस. टी. महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अशाप्रकारे खेड व दापोली मार्गांवरही वडाप सुरू आहे. या दोन्ही मार्गांवरील वडापवाले एस. टी.च्या भाड्याइतकीच रक्कम प्रवाशांकडून घेतात़ मात्र, बाणकोट ते मंडणगड या मार्गावरील वडापवाले मात्र आपण वडाप करून जणू लोकांवर मोठे उपकार करत आसल्याच्या अविर्भावात वावरत आहेत व सामान्य जनतेची लूट करीत आहेत. एस. टी. पशासनाने अशा वडाप करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे. वडापवाले आपल्या गाड्यांमधून, गाडीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून, नागरिकांच्या जीवाशी खेळतात. या अवैध वाहतुकीकडे पोलीस यंत्रणेचे लक्ष नसते़ त्यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्या या गाड्यांना अभय कोणाचे आहे? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. यापूर्वीही वडाप करणाऱ्या काही गाड्यांना अपघात होऊन, प्रवाशांना इजा झाली आहे. मात्र, त्यातूनही वडाप करणारे काही शिकलेले नाहीत. मंडणगड ते बाणकोट मार्गावरील वडाप चालकांबाबत प्रवाशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. (वार्ताहर)