शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

‘लोकमत’ने मोबाईलबरोबरच दिली ‘संस्कारां’ची स्फूर्तीही...

By admin | Updated: July 8, 2016 01:05 IST

इंटरनेटमुळे जगातील संवाद वाढला आहे. भविष्यात या मोबाईलचा मला चांगला वापर करता येईल.

रत्नागिरी : विविध स्पर्धांमधून मी आजपर्यंत सहभागी झाले, परंतु बक्षीस मिळालं नव्हतं. परंतु ‘लोकमत’ आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेतील सहभागातून मला मोबाईल बक्षीस मिळाला. आनंद तर खूप खूप झाला, परंतु बक्षिसामुळे मला ‘संस्कारा’ची स्फूर्ती मिळाली असल्याचे सेके्रड हार्ट कॉन्व्हेट स्कूल, उद्यमनगरच्या इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या अनुष्का गजानन घोडे हिने सांगितले.‘लोकमत’ पेपर आमच्या घरी गेली कित्येक वर्षे येत आहे. लोकमत आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत मी सलग दोन वर्षे सहभागी होत आहे. परंतु मला कधीच बक्षीस मिळाले नव्हते. सहभागाचे प्रमाणपत्र मिळाले होते. गतवर्षी मी स्पर्धेत सहभागी झाले. प्रसिध्द होणारी कूपन्स मी रोजच्या रोज कापून चिकटवत असे. चार्ट पूर्ण झाल्यानंतर मी तो शाळेतील बॉक्समध्ये जमा केला. स्पर्धेच्या कालावधीत प्रसिध्द होणारे परिपाठाचे पूर्ण पान मी वाचत असे. इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमध्ये माहिती उपलब्ध असल्याने मी वाचत होते. न समजणारे शब्द व त्यांचा अर्थ आईकडून समजावून घेत असे. त्यामुळे माझे मराठी चांगले सुधारले आहे. दिनविशेष, सुविचार, बोधकथा तसेच हटके सदरे खूपच छान होती. बालमित्रांचे फोटो तर पाहायला खूप खूप आवडायचे. केवळ स्पर्धा कालावधीत नाही तर इतर दिवशीही पेपर आमच्या घरी येत असल्यामुळे मी दररोज वाचन करते. प्रसिध्द होणाऱ्या बातम्या वाचायला आवडते. माझे वाचन सातत्याने सुरू आहे. ‘लोकमत’ कार्यालयातून बक्षीस जाहीर झाल्याचे बाबांच्या फोनवर कळविण्यात आले.मोबाईलवर मला गेम खेळायला आवडते. आजपर्यंत बाबांच्या व आईच्या मोबाईलवर गेम खेळत असे. मोबाईलवरील विविध अ‍ॅपमुळे खूप माहिती उपलब्ध होते. इंटरनेटमुळे जगातील संवाद वाढला आहे. भविष्यात या मोबाईलचा मला चांगला वापर करता येईल. आता मी शाळेत जात असल्याने त्याचा मला उपयोग नाही. त्यामुळे मी तो आईकडे सुरक्षित ठेवायला दिला आहे. परंतु मला मिळालेला, माझा मोबाईल म्हणून मिळणारा आनंद नक्कीच वेगळा आहे. मुख्याध्यापिका सिस्टर आयरिन यांनी मला बक्षीस लागल्याचे जाहीर केले तेव्हा साऱ्यांनी माझे कौतुक केले. सिस्टर आयरिन यांच्या हस्ते मला मोबाईल देण्यात आला, त्यावेळचा आनंद शब्दात व्यक्त करण्यात येणारा नव्हता. आता अभ्यास व ‘लोकमत’च्या यावर्षीच्या स्पर्धेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’च्या संस्कारांचे मोती स्पर्धेत अनुष्काने स्वत: सहभागी होणार असल्याचे सांगितले. मी तिला तातडीने होकार दिला. परंतु दररोज वर्तमानपत्र वाचनाची अट घातली. तिची सकाळची शाळा असल्याने संध्याकाळी ती पेपर वाचत असे. वाचनामुळे तिच्या जनरल नॉलेजमध्ये भर पडत आहे, शिवाय तिचे मराठी सुधारले आहे. कूपन कापून ती स्वत: चिकटवत असे. बिक्षीस मिळाल्याचे कळले तेव्हा खूप अभिमान वाटला. अनुष्काला मिळालेल्या बक्षिसामुळे तिच्या छोट्या बहिणीला तसेच मैत्रिणींना प्रेरणा मिळाली आहे. दररोजच काम आटोपल्यावर मी दुपारी सवडीने पेपर वाचते. ‘सखी’ पुरवणी तर मला खूप आवडते. आठवड्याने प्रसिध्द होणाऱ्या सखीची मी वाट पाहात असते. - नलिनी गजानन घोेडे (आई)‘लोकमत’कडून मिळालेल्या बक्षिसामुळे खूप आनंद झाला. पाल्याचे कष्ट सत्कारणी लागले. इतकेच नव्हे; तर तिला स्फूर्ती मिळाली. ‘लोकमत’ मी सातत्याने वाचतो. देश-विदेशातील बातम्या, स्थानिक बातम्याचं कव्हरेज चांगल आहे. स्पोर्ट्स न्यूज तर आवडीचे आहे. संपादकीय लेखन छान असतं. शिवाय अंकाची किंमतही चांगली आहे. त्यामुळे ‘लोकमत’ अंक आमच्या कुटुंबातील घटक बनला आहे.गजानन घोेडे (वडील)े