शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

७५६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकावर धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 23:25 IST

जिल्हा परिषद : शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मोठी मदत

रहिम दलाल-- रत्नागिरी --विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून अध्यापनाचे धडे देण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ७५६ प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मोठा आधार लाभणार आहे. जिल्हा परिषदेच्या २१ शाळांना आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेच्या २७२० प्राथमिक शाळा आहेत. चालू शैक्षणिक वर्षामध्ये शून्य पटसंख्येच्या १३ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. १ ते २० पटसंख्येच्या १२०० शाळा आहेत. शाळांमधील कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळत असताना विद्यार्थीसंख्या कमी होत चालल्याने या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. संगणक युग असल्याने शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना त्याच्या वापराविषयी माहिती मिळावी, त्यादृष्टीने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाधिक शाळा डिजिटल बनवण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.जिल्हा परिषदेच्या २५१ केंद्रशाळांमध्ये डिजिटल स्कूल ही संकल्पना राबवण्यात येणार होती. चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, तळवडे क्रमांक १ ही जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा ठरली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन डिजिटल स्कूल करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार लोकवर्गणी गोळा करून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ७५६ प्राथमिक शाळा डिजिटल बनविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज ग्रामीण भागातील विद्यार्थीही संगणकावर शिक्षणाचे धडे घेत आहेत. डिजिटल स्कूल तयार करण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपये लोकवर्गणीतून गोळा करून खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये शासनाच्या दमडीचाही खर्च करण्यात आलेला नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचावत असल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनासाठी नक्कीच सुखकारक ठरत आहे.