शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांकडून शिकायला हवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST

यंदाच्या चैत्रातही बुलबुल जोडप्याने परसातल्या कुंदीच्या झुडपात काड्या विणायला सुरुवात केली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. अशा पाखरांचा ...

यंदाच्या चैत्रातही बुलबुल जोडप्याने परसातल्या कुंदीच्या झुडपात काड्या विणायला सुरुवात केली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. अशा पाखरांचा असा सहवास दरवर्षी आम्हास खूप सुखावून जातो. दोनच दिवसांत दोघांनी घरटे पूर्णही केले; पण तिसऱ्या दिवशी त्यांचे काय बिनसले माहीत नाही, दोघेही विणलेल्या घरट्याची एकेक काडी काढून दुसरीकडे घेऊन गेले. संध्याकाळपर्यंत त्या झुडपात घरट्याचा लवलेशही राहिला नाही. दरवर्षी हे बुलबुल जोडपे असे कधी आमच्यावर नाराज होत नाहीत. आमच्या घरातल्या कोणालाही ते घाबरतही नाहीत. दरवर्षी पिलांना उडायला शिकविताना तीन-चार दिवस चिमण्या पिलांना आमच्या परसातल्या जास्वंदीच्या फांदीवर मोठ्या विश्वासाने व आपुलकीने बसवून ठेवतात. दररोज सकाळी न चुकता खिडकीत बसून गाणी गातात. आमच्या चिनूला तेच झोपेतून जागे करतात. सकाळी मी फेकलेले दाणे आवडीने टिपतात. हल्ली मी रोज पाहतो, आताच्या पक्ष्यांच्या आवडीनिवडी माणसांप्रमाणे बदलल्या आहेत. हे बुलबुल दररोज सकाळी फेकलेल्या धान्यापेक्षा भाजलेल्या चपातीचे छोटे तुकडे, शिजलेल्या भाताची शिते अधिक आवडीने खातात. संध्याकाळी मी झाडांना पाणी घालतो तेव्हा ही पाखरे त्यांच्या सवंगड्यांनाही बोलावून आणतात. माडाच्या अळ्यात साठलेल्या पाण्यात मनसोक्त डुबक्या

घेतात, पिसे झाडतात, मज्जा मज्जा करतात. परवा अचानक आलेल्या ‘तौउते’ चक्रीवादळात आमच्या परसातल्या व परिसरातल्या झाडांची बरीच

हानी झाली. खूप झाडे पिळवटून उन्मळून पडली, काहींच्या फांद्या तर काहींचे शेंडे जमीनदोस्त झाले. वादळानंतर परसात साफसफाई करताना मनात विचार आला, बरे झाले यंदा बुलबुल पक्ष्यांनी येथून घरटे हलविले. नाही तर आता त्या घरट्यात अंडी किंवा पिले असती तर त्यांचे काय झाले असते? अशा जिवापाड जपलेल्या पाखरांचे हाल मलाही बघवले नसते; पण काल आमच्या प्रोजेक्टमध्ये फेरफटका मारताना मला फार मोठा धक्काच बसला. आमच्या परसातल्या कुंदीवर विणलेले घरटे बुलबुल जोडप्याने थेट आमच्या पंपहाऊसच्या केबिनमध्ये हलविले होते. तेथील स्वीचबोर्डजवळच्या खोबणीतल्या त्या घरट्यात तीन गोजिरी पिले परस्परांच्या मानेत मान घालून शांत झोपली होती. बुलबुल जोडपेही मोठ्या खुशीत अधूनमधून भुर्र उडून त्यांच्यासाठी दाणापाणी आणत होते. नंतर आमच्या चिनूने शेजारच्याच बांधकाम सुरू असलेल्या बंगल्यात आणखी एक बुलबुल पक्ष्याचे घरटे पाहिले. तिथेही बेडरूमच्या सध्या बिनदरवाजाच्या खोलीतल्या स्वीचबोर्डसाठी भिंतीत खोदलेल्या कप्प्यात तशाच बुलबुल पक्ष्यांनी घरट्यात तीन अंडी घातली होती. याशिवाय आमच्याच बागेतल्या बांधलेल्या बांधातल्या दगडांमध्ये बसविलेल्या एका

पाइपमध्ये साळुंकी पक्ष्याने घरटे बांधले होते. त्यात त्याची पिलेही दिसली. कितीही वादळ झाले किंवा पाऊस पडला तरी अजिबात धोका नाही अशा जागा या मुक्या पक्ष्यांनी कशा बरे निवडल्या असतील?

ताैउते या अतिविध्वंसक वादळाची पूर्वकल्पना आपल्याला चार-पाच दिवस अगोदर माहीत झाली होती. मात्र, या बुलबुल किंवा साळुंकीसारख्या पक्ष्यांना या संभाव्य संकटाची कल्पना महिना-दीड महिना आधीच आली होती. त्यामुळेच त्यांनी आधीच सावध होऊन अगदी सुरक्षित जागा निवडल्या होत्या. आता मी दररोज फिरताना मुद्दाम जवळच्या झाडाझुडुपांत डोकावून बघतो. मला उघड्या झाडांवर एकही नवे घरटे दिसले नाही. कदाचित इतर पक्ष्यांनीही यावेळेस अशाच सुरक्षित जागा शोधल्या असाव्यात. दरदिवशी नवनवीन तंत्रज्ञान शोधल्याची व प्रगती केल्याची बोंबाबोंब करणाऱ्या माणसांनी या पक्ष्यांकडून काहीतरी शिकायला हवे.

- बाबू घाडीगावकर, जालगाव, दापोली.