शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

अखेर घडलंच...

By admin | Updated: October 30, 2015 23:25 IST

आणखी एक मासा लाचलुचपतच्या जाळ्यात

ज्योतिप्रसाद सावंत -आजरा--शासकीय कामे करून घ्यायची म्हणजे संबंधित कर्मचारी अथवा अधिकारी यांच्या उपकाराखाली राहायचे, अशीच कांहीशी भावना सर्वसामान्य नागरिकांकडून होत असल्याने ‘खुशाली’च्या नावाखाली पदाचा गैरवापर करीत राजरोजपणे लुटण्याचा अतिरेक झाला की, लाचलुचपतच्या जाळ्यात अडकण्यात फारसा वेळ लागत नाही, हे आजरा येथील नुकत्याच झालेल्या भूमी अभिलेखमधील प्रकरणाने अधोरेखित झाले आहे.वास्तविक महसूल विभाग अशा प्रकरणात आघाडीवर असता; परंतु महसूलबरोबर पोलीस, पोलीसपाटील, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, वनविभाग येथेही असे प्रकार घडले आहेत. इतरत्रही घडतच असतात; पण आजरेकरांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांचा यातून मुजोरपणा वाढतो. भरमसाठ मागण्या होऊ लागतात. सहनशीलता संपली की, मग शेवटचा आधार लाचलुचपत खाते राहते. सोमवार ते गुरुवार याच कामात वाडकर गुंतलेला असायचा. शुक्रवारी मुख्य अधिकारी आले की, सहीसाठी कागद सरकवायचे आणि अधिकाऱ्यांच्या नावावार पक्षकारांकडून वसुली करण्याची हा प्रकार अखेर महागात पडला आहे. यामुळे आणखी एक खाते बदनाम झाले आहे हे नक्की.याचा परिणाम म्हणजे कामांसाठी पक्षकारांना खेटे मारावे लागतात. ‘स्थावर’ लाखोंचे व्यवहार अडकून राहिल्याने चकरा मारून वैतागलेला ‘सामान्य’ माणूस काहीतरी घ्या; पण काम करून द्या, असे साधे गणित संबंधित कर्मचाऱ्यांसमोर ठेवतो आणि आपण पगारी कर्मचारी आहोत याचे भान विसरून खुशालीचे गोंडस नाव पुढे करून दिल्या जाणाऱ्या रकमा हक्काच्या समजल्या जातात.तक्रारींचा पाऊसआजरा तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांच्याबाबत ‘लाचलुचपत’कडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल होत आहेत. यावरून लोकप्रतिनिधींचा शासकीय विभागावर अंकुश राहिला नाही, असेच म्हणावे लागेल. भूमी अभिलेखची तर तऱ्हाच वेगळी आहे. मुळातच या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. तालुका भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना एकाचवेळी वेगवेगळ्या तालुक्याची जबाबदारी दिल्याने हाताखालील कर्मचारी कारभाराचा गाडा हाकताना दिसतात. प्रॉपर्टी कार्ड, नकाशे तयार करणे, मोजणीची कामे, न्यायालयीन तारखांना हजर राहणे हे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शक्य होत नाही.