शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साकव मोजतोय अखेरच्या घटका

By admin | Updated: November 11, 2014 23:24 IST

मागणी प्रलंबित : हातदे निळंद ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाना हरताळ

पाचल : राजापूर तालुक्यातील पूर्व विभागात हातदे - मिळंद जोडणारा लोखंडी साकव अखेरच्या घटका मोजत असल्यामुळे त्यावरुन प्रवास करणे जिवावर बेतणार आहे. जिवघेण्या प्रवासाला जिल्हा परिषद जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मिळंद हातदे ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा करुनसुद्धा कोणीच लक्ष न दिल्याने साकवाची दुरवस्था कायम आहे.राजापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेली जामदा खोऱ्यातील हातदे व मिळंद गावे डोंगराळ भागात वसलेली आहेत. या गावांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. दळणवळणाच्या दृष्टीने हे गाव खूपच मागासलेले आहे. त्याचा परिणाम गावातील इतरही गोष्टींवर झालेला दिसून येतो. नदीपलीकडील हातदे गावची व्यथा तर निराळीच आहे. या गावाला इतर गावांशी संपर्क करण्यासाठी हा मोडका पूलच जवळचा मार्ग आहे.प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाची सोय या गावात उपलब्ध नसल्याने मिळंद गावच्या आयरे विद्यालयात, तर ज्युनिअर कॉलेजसाठी पाचलला, सिनीअर कॉलेजसाठी रायपाटण येथे याच मोडक्या पुलावरुन जावे लागते. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही हातदे गावच्या ग्रामस्थांना या पुलाचा वापर करावा लागतो. पर्यायी मार्ग खूपच लांब असल्याने हातदे गावचे ग्रामस्थ व विद्यार्थी जीव मुठीत घेऊन या पुलावरुन प्रवास करत आहेत.जिल्हा परिषद सदस्य याच गावचे आहेत. तरीसुद्धा हा विषय आजपर्यंत मार्गी लागलेला नाही. राजापूर तालुक्यातील या महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)