शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

किंजळे गाव आजही विजेविना

By admin | Updated: April 14, 2016 21:43 IST

बुडीत क्षेत्र : लोकवस्ती नाही; जिल्ह्यात १५३९ गावांमध्ये पोहोचली वीज

रत्नागिरी : जिल्ह्यातील विद्युत विस्तार झपाट्याने वाढला आहे. जिल्ह्यात एकूण १५३९ गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण झाले असून, ४४ उपकेंद्रांतून वीजपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये बुडीत क्षेत्रात मोडत असलेल्या किंजळे गावी वस्ती नसल्याने तेथे अद्याप वीज पोहोचली नसल्याची माहिती महावितरणांच्या सुत्रांनी दिली.जिल्ह्यात महावितरण कंपनीचे सुमारे ५ लाख ग्राहक आहेत. महिन्याला वीजग्राहकांत सरासरी दोन हजारची वाढ होते. त्यांना तत्पर सुविधा देण्याचे काम महावितरण करत आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्युत जाळे झपाट्याने वाढत जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात १०० टक्के विद्युतीकरण झाले असल्याचे आहे.जिल्ह्यात एकूण १५३९ गावे असून, गावोगावी वीज पोहोचली आहे. खेड्यापाड्यात वीज पोहोचल्याने उद्योगधंद्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. रत्नागिरी तालुक्याला ११ उपकेद्रांतून वीज पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात ३३ केव्हीचे ९८४ किलोमीटरचे जाळे पसरलेले आहे, ११ केव्हीची ५ हजार ४६८ किलोमीटरची लाईन आहे, तर लघुदाब वाहिनीचे सुमारे ९ हजार २८३ किलोमीटरचे जाळे पसरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील किजळे हे गाव गडनदी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात असल्याने या गावातील राहणाऱ्या लोकांनी स्थलांतर केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील १५३९ गावांमध्ये विद्युतीकरण झाले. परंतु वस्तीअभावी किंजळे गावी अद्याप वीज पोहोचली नाही. रत्नागिरीमध्ये ११ उपकेंद्र, संगमेश्वर ४, राजापूर ५, लांजा ३, चिपळूण ७, गुहागर ३, खेड ४, दापोली ५ व मंडणगड येथे २ अशी मिळून रत्नागिरी जिल्ह्यात ४४ उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अखंडपणे वीजपुरवठा सुरू असल्याची माहिती महावितरणाच्या सुत्रांनी दिली. (वार्ताहर)ग्रामीण भागात जाळे : तब्बल ४४ उपकेंद्रातून वीजपुरवठाजिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत विजेचे जाळे पोहोचलेले आहे. तब्बल ४४ उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जात असून, महावितरणकडून अखंडपणे हा वीजपुरवठा केला जात आहे.शेतकऱ्यांना शेतीपंपरत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या सात वर्षात सुमारे ३ हजार ५९६ शेतीपंप वीजजोडण्या मंजूर करण्यात आल्या असून, वर्षाला सरासरी ५०० शेतकऱ्यांना शेतीपंप वीज जोडण्यात देण्यात आल्या असल्याची माहिती महावितरणाच्या सुत्रांनी दिली.