शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

खडपोली ग्रामपंचायतीने उभारले स्वतःचे कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

चिपळूण : तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर पहिल्यांदाच कोविड केअर सेंटर सुरू झाले आहे. गावातील लोकांच्या हितासाठी खडपोली ग्रामपंचायतीने स्वतःचे कोविड ...

चिपळूण : तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर पहिल्यांदाच कोविड केअर सेंटर सुरू झाले आहे. गावातील लोकांच्या हितासाठी खडपोली ग्रामपंचायतीने स्वतःचे कोविड केअर सेंटर सुरू केले. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना गावातीलच दोन डॉक्टर सेवा देणार आहेत. शिवाय मोफत जेवनासह औषधोपचार आणि आवश्यकतेवेळी रुग्णांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था आहे. स्वतःचे कोविड सेंटर करणारी खडपोली ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव, जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत खडपोली कोविड केअर सेंटरचे सोमवारी उद्‌घाटन झाले. सेंटरसाठी गावातील जिल्हा परिषद शाळा ताब्यात घेतली. सेंटरची प्रांताधिकारी, तहसीलदार आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी या सेंटरची पाहणी करून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले होते. गावात अजूनही कोरोना बाधित रुग्ण आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना या कोविड सेंटरसाठी उपचार केले जाणार आहे. येथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी खडपोलीतील दोघा डॉक्टरांनी सामाजिक बांधीलकीतून पुढाकार घेतला आहे. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रुग्णांना मोफत औषधोपचार केला जाणार आहे. एखाद्या रुग्णास तातडीने ऑक्सिजन हवा असल्यास ऑक्सिजनचा साठाही उपलब्ध केलेला आहे.

या सेंटरसाठी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार घेऊन आदर्शवत पाऊल टाकले आहे. गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांची वेगळी व्यवस्था करावी. यासाठी हे सेंटर सुरू केले आहे. या सेंटरसाठी सरपंच नेहा खेराडे, उपसरपंच मंगेश गोटल, ग्रामसेवक रोहिदास हांगे, सदस्य महेश मोहिते, अक्षया तांबट, सारिका भुवड, अक्षता कदम, राजेश पवार, तुकाराम कदम, सारिका चांदीवडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले.

------------------------------------

चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील कोविड सेंटरचे उद्घाटन गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. ज्योती यादव, विनोद झगडे आदी उपस्थित होते.