शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीमध्ये २१पासून कालिदास व्याख्यानमाला

By admin | Updated: November 17, 2014 23:52 IST

पुणे येथील वैदिक संशोधन मंडळाच्या संचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. भाग्यलता अशोक पाटसकर या प्रमुख व्याख्यात्या

रत्नागिरी : गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातर्फे यावर्षी दि. २१ व २२ नोव्हेंबर रोजी कालिदास स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेला पुणे येथील वैदिक संशोधन मंडळाच्या संचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. भाग्यलता अशोक पाटसकर या प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. दि. २१ नोव्हेंबर रोजी ‘यज्ञ म्हणजे काय?’ या विषयावर, तर शनिवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी ‘सोमयाग’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. शहरातील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सायंकाळी ५ वाजता डॉ. भाग्यलता पाटसकर हे व्याख्यानपुष्प गुंफणार आहेत.डॉ. भाग्यलता पाटसकर यांनी १९८५ ते २००० या काळात ‘संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, पुणे’ येथे संशोधक म्हणून कार्य केले. २००० पासून ‘वैदीक संशोधन मंडळ, पुणे’ येथे संचालक म्हणून कार्यरत. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अध्यापन, पीएचडी मार्गदर्शक आहेत. त्यांनी ३४ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये निबंध वाचनात सहभाग घेतला. त्यांचे गुरुगीता, कठ आरण्यक, पवित्रेष्टी इत्यादी पुस्तकांचे सटीप भाषांतर, १३ ग्रंथांचे संपादन, ६ ग्रंथांकरिता सहसंपादन, ७५ शोधनिबंध व लेख प्रकाशित तसेच शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन धनपाठाच्या ९० डी. व्ही. डी. तयार करण्याचा प्रकल्प पूर्ण. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कवी कुलगुरु कालिदास विश्वविद्यालय, रामटेक येथे (२०१०-१५) या कालावधीत विद्यासमितीवर नेमणूक, सातवळेकर पुरस्कार, कवीकुलगुरु कालिदास विश्वविद्यालय, रामटेक यांचा वेदविभूषण पुरस्कार, पं. लाटकर शास्त्री पुरस्कार, मुंबई यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.महाविद्यालयात आयोजित केलेल्या या कालिदास स्मृती व्याख्यानमालेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)