शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

‘जाणीव’च्या वेबसाईटचे उद्या लोकार्पण

By admin | Updated: December 23, 2014 23:40 IST

रक्तदान क्षेत्रात समाजासाठी संस्थेचे क्रांतिकारी पाऊल

रत्नागिरी : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील रक्तदात्यांची आॅनलाईन माहिती उपलब्ध असणाऱ्या जाणीव फाऊंडेशन या समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या संस्थेच्या रक्तदान क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल ठरणाऱ्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा गुरूवार, २५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.जाणीव फाऊंडेशनने अतिशय कमी वेळेत अत्यावश्यक समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. जाणीवने बनविलेली जिल्ह्यातील पहिली ब्लड डोनर डिरेक्टरी अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदान देणारी ठरली आहे. रक्ताची आवश्यकता असणाऱ्या हजारो रुग्णांना जाणीवने रक्त मिळवून देऊन मोलाची कामगिरी बजावली. रक्त विघटन केंद्राची असणारी दुरवस्था, सततचे अपघात आणि डेंग्यूसारख्या रोगांची पसरणारी साथ यामुळे रक्ताची गरज दिवसेंदिवस वाढत आहे.आता रक्तदान क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल ठरणारी जाणीवची ही वेबसाईट गुरुवार, दिनांक २५ रोजी जनतेला समर्पित केली जाणार आहे. शहरातील शिवाजीनगर येथील सिध्दिविनायक हॉल येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने देश - विदेशात नावलौलिक मिळविलेले टी. व्ही.स्टार जयंत ओक यांचा गाजलेला कार्यक्रम विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे. ही वेबसाईट म्हणजे केवळ संस्थेची माहिती नसून, यामध्ये लवकरच रत्नाागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील प्रत्येकी एक हजार रक्तदात्यांची नावे आणि संपर्क क्रमांक यावर उपलब्ध होणार आहेत. यामुळे रत्नागिरीतील कोणत्याही तालुक्यातील अगदी दुर्गम भागातील रक्ताची गरज असणारा रुग्ण आता जवळच्या रक्तदात्याशी अगदी मोबाईल वरूनही संपर्क करु शकणार आहे. तसेच रत्नागिरीतील कोणत्याही तालुक्यातील रक्तदाता आपली नोंदणी आॅनलाईनद्वारे मोफत नोेंदवू शकणार आहे. रत्नागिरीतील तरुणांनी समाजासाठी उचललेले हे क्रांतिकारी पाऊल आहे. अधिक माहितीसाठी अमित सामंत ८०८७३३५९०४, संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधावा. जाणीवच्या या योजनेत सहभाग दर्शवावा, असे आवाहन ‘जाणीव’चे अध्यक्ष महेश गर्दे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)