शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जैतापुरात आज जेलभरो आंदोलन

By admin | Updated: December 12, 2015 00:16 IST

मच्छिमार सहभागी होणार : प्रकल्पाची पर्यावरणाची मुदत संपल्याने आंदोलनकर्ते आक्रमक

राजापूर : राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर प्रकल्प परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, या आंदोलनात सर्व मच्छिमार उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवणार आहेत. नियोजित प्रकल्पाची पर्यावरणाची संपलेली मुदत, केंद्र व राज्यातील सत्तेतील सहभागी शिवसेनेचा प्रकल्पाला असणारा प्रखर विरोध यामुळे शनिवारी नक्की काय घडणार, याकडे लक्ष राहिले आहे.जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला अद्याप विरोध सुरूच आहे. जनहक्क सेवा समिती व शिवसेना यांच्यावतीने १२ डिसेंबरला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला ठाम विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जेलभरो आंदोलनामध्ये जैतापूर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील दशकाहून अधिक काळ हा प्रश्न सातत्याने गाजत आहे. अणुसारख्या घातक पदार्थावर ऊर्जा निर्मिती करताना त्यातून होणारे रेडीएशन यामुळे परिसरातील फळबागा, भातशेती, मच्छिमारी व मानवी जीवनावर विपरीत परिणाम होईल, या भीतीने प्रकल्पाविरुद्ध चांगलाच लढा सुरु आहे. मात्र, मधल्या काही महिन्यात प्रकल्पात जाणाऱ्या जमिनींचे नुकसान भरपाईचे अनुदान हेक्टरी साडेबावीस लाख एवढे करण्यात आल्याने जनतेने शासनाकडून नुकसान भरपाईच्या अनुदानाचे धनादेश स्वीकारले. त्यामुळे प्रकल्पाविरुद्ध असणारा विरोध कमी होत असतानाच परिसरातील मच्छिमार बांधवांना नियमानुसार प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता नसल्याने त्यांचे भविष्यात अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे साखरीनाटेतील असंख्य मच्छिमारांचा प्रकल्पाला असलेला विरोध अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे शनिवारच्या जेलभरो आंदोलनाला मच्छिमार बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. त्यासाठी ते आपापल्या बोटी किनाऱ्यावर लावून सहभाग घेतील, अशी माहिती मच्छिमारांनी दिली. (प्रतिनिधी)विरोध कायम : बोटी किनाऱ्यावरनियोजित अणुऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून दिलेल्या पर्यावरणाच्या दाखल्याची मुदत संपली आहे. पर्यावरणाची संपलेली मुदत वाढवून देऊ नका, अशी मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी होत असलेल्या आंदोलनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.प्रकल्पाचे काम सुरूजैतापूर येथील प्रकल्पाला विरोध होत असला तरी या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी नियोजित जागेवर संरक्षक कठडाही उभारला आहे.