शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

जगबुडी नदी पर्यटन वाढीसाठी उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेड : ऐतिहासिक वारसा असलेल्या जगबुडी नदीकडे पर्यटकांना आकर्षून घेण्याची क्षमता आहे. या नदीपात्रात गेली कित्येक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खेड : ऐतिहासिक वारसा असलेल्या जगबुडी नदीकडे पर्यटकांना आकर्षून घेण्याची क्षमता आहे. या नदीपात्रात गेली कित्येक वर्षे मगरींचे वास्तव्य असल्याने येथे पर्यटक मोठ्या संख्येने येऊ शकतात. मात्र त्यासाठी या परिसरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, अस्वच्छता या प्रमुख समस्यांबाबत प्रशासनाला काटेकोरपणे काम करावे लागणार आहे. जर या गोष्टी सांभाळल्या गेल्या तर जगबुडी नदी ही खेड शहराला पर्यटनाच्या नकाशावर घेऊन जाईलच, शिवाय रोजगाराचे नवे पर्याय स्थानिकांसाठी उपलब्ध होऊ शकतील.

मुंबई गोवा महामार्गाला खेटून असणाऱ्या खेड शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सह्याद्री पर्वताच्या उत्तुंग रांगा, गड-किल्ले व बारमाही वाहणारी जगबुडी नदी तालुक्याचे वेगळेपण आहे. जगबुडी नदी किनाऱ्यावर वसलेल्या खेड शहरात एके काळी मोठे बंदर होते. या बंदरातून देशी परदेशी मोठमोठ्या गलबतातून व्यापार चालत असे. मात्र काळाच्या ओघात बंदर वाहतूक बंद झाली तरी याचा ऐतिहासिक खुणा आजही बंदर परिसरात दिसून येतात.

राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जगबुडी नदी किनारा व बंदर परिसराला गतवैभव मिळवून देण्यासाठी क्रोकोडईल पार्क प्रकल्प राबवण्यासाठी गेली पाच वर्षे प्रयत्न केले होते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वेस्थानक यापासून जवळच हा भाग आहे. जगबुडी नदीपात्रात गेले कित्येक वर्षांपासून गाळ साचलेला असल्याने येथील नदीपात्र भोस्ते व देवणे परिसरातील किनारी भागात मगरींचा अधिवास निर्माण झाला आहे. नैसर्गिक सौंदर्य व मोक्याचे ठिकाण असल्याने या परिसराला सजवण्यासाठी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम व नगरपरिषद प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु जगबुडी किनाऱ्यावरील शहराच्या दर्शनी भागात असलेल्या अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, अस्वच्छता या प्रमुख समस्या ते कसे सोडवणार आहेत हे आगामी कालावधीत पाहावे लागेल.

एका बाजूला लोकप्रतिनिधी शहराच्या सौंदर्यवर्धनासाठी लाखो करोडो रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित करत आहेत तर दुसरीकडे या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्यांना प्रशासन अभय देत असल्याचे विदारक चित्र आहे. खेड शहराचा पर्यटन दृष्टीने विकास करायचा असल्यास जगबुडी नदी किनाऱ्याचा दर्शनी भाग नक्कीच मोठी संधी उपलब्ध करून देणारा आहे. मात्र हे सत्यात उतरवण्यासाठी कागदावरच्या नियोजनासोबतच प्रत्यक्ष किनाऱ्यावरील भागात कृतिशील प्रयत्नांची जोड देणे आवश्यक आहे. या भागातील समस्या सोडवून निधीची उपलब्धता करून पर्यटनदृष्टीने विकासात्मक कामे करणे आवश्यक आहे. समुद्र किनाऱ्याची ओढ असलेले पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक खेड मार्गे दापोली गाठतात. या पर्यटकांना जगबुडी नदीत बोटिंग, मगर दर्शन यासारखे उपक्रम राबविल्यास शहरात पर्यटकांची संख्या निश्चितच वाढेलच त्याचबरोबर आर्थिक उलाढाल वाढण्यास व नवीन उद्योग व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होईल यात शंका नाही.

...................

अतिक्रमणे हटवावीत : आमदार कदम

जगबुडी नदीकिनाऱ्यावर शहराच्या दर्शनी भागाचे सौंदर्य वाढवून तेथे बोटिंग व क्रोकोडईल पार्क उभाण्यासाठी राज्य शासनाने नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी तेथील अतिक्रमणे व इतर समस्या सोडवाव्यात अशा सूचना मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना केल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली.