शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

क्रीडांगणाअभावी गैरसोय

By admin | Updated: January 23, 2015 23:39 IST

खेड तालुका : नव्वद टक्के शाळांमध्ये प्रश्न कायम

श्रीकांत चाळके - खेड-शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असे शारिरीक शिक्षण आणि खेळाला विशेष असे प्रोत्साहन दिले जात नाही़ एवढेच नव्हे तर, जिल्हा परिषदेच्या जवळपास ९० टक्के शाळांना आवश्यक असे, क्रिडांगण नसल्याची दुर्दैवी बाब समोर आली असून खेड तालुक्यातील तब्बल ३५७ शाळांना क्रिडांगण नसल्याने, शाळांची अवस्थाच दयनीय झाल्याचे अधोरेखीत झाले आहे़ यामुळे अर्थातच ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडुंना संधीच मिळत नसल्याची, खंत व्यक्त होत आहे़जिल्हयातील अनेक प्राथमिक शाळा आजही पायाभूत भौतिक सुविधांपासून वंचित आहेत़ अपंगांसाठीचे रॅम्प, स्वयंपाक गृहे, संरक्षक भिंत, क्रिडांगणे, आणि मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी किमान एक वर्गखोली आदी सुविधांना आजही शिक्षकांसह विद्यार्थीही मुकले आहेत़ विविध खेळांमध्ये नवनवे विद्यार्थी खेळाडू तयार व्हावेत, याकरिता शासनाच्या क्रिडा विभागाकडून क्रिडांगणासाठी तसेच क्रिडांगणाच्या विकासासाठी १ लाख रूपयांचे अनुदान या शाळांना दिले जाते़ क्रिडा साहित्य आणि मैदान निर्मितीकरीता हा खर्च करण्यात येतो. मात्र, तरीही या शाळांना क्रिडांगणच नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.़ मैदानाअभावी खेळाडू कसे निर्माण होतील, हा प्रश्न वारंवार भेडसावत आहे़ खेड तालुक्यातील एकुण शाळांपैकी ३५७ शाळांना आजही क्रिडांगण नाहीत़ तर २१४ शाळांना संरक्षक भिंत नसल्याची धक्कादायक बाब आता लपून राहिलेली नाही.़ जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक शाळांचीे माहिती एकत्रित करून, शासनाला देण्यात आली होती़ या माहितीवरून जिल्ह्यातील अनेक शाळा आजही पायाभूत सुविधांपासुन वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.़ विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रिडांगणच नसेल तर खेळाडू घडणार नाहीत. गावातील भाताच्या चोंड्यातून आणि गवतातून मार्ग काढत त्यांचा मैदान म्हणून वापर करणारे, खेळाडू खेळामध्ये अखेर मागासच राहणार यात शंका नाही़ मैदानाअभावी खेळाडूंना आपले क्रीडा नैपुण्य दाखवण्यासाठी संधी मिळत नाही़ इच्छा असूनही अनेक खेळाडू मैदानाबाहेर राहत असल्याची खंत व्यक्त होत आहे़ निदान प्राथमिक शाळांमधून अशी क्रिडांगणे झाली, तरच ग्रामीण खेळाडू तयार होण्यास चांगली मदत होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वेगळे निकष हवेत...शासनाच्या क्रीडा विषयक धोरणांचा फेरविचार करण्यासाठी प्रयत्न.ग्रामीण भागात आधुनिकतेशी स्पर्धा करतील असे क्रीडा प्रकार नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय.शासन धोरणानुसार प्रत्येक शाळेला क्रिडांगण हवे, मात्र ...ग्रामीण भागात असणाऱ्या शाळांमध्ये खेळांच्या विकासासाठी विशेष लक्ष नाही.जिल्हापरिषदेच्या अनुदानातून विकास होईल शक्य.