शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जमीन खचण्याच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

राजापूर : अतिवृष्टीमुळे तालुक्यात जमीन खचण्याच्या घटना घडत आहेत. तारळ - चौके रस्त्यासह विखारेगोठणेकडे जाणारा रस्ता आणि त्या मार्गावरील ...

राजापूर : अतिवृष्टीमुळे तालुक्यात जमीन खचण्याच्या घटना घडत आहेत. तारळ - चौके रस्त्यासह विखारेगोठणेकडे जाणारा रस्ता आणि त्या मार्गावरील कॉजवे डोंगर येथे खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सरींवर असणार्‍या पावसाने जोर धरला आहे. त्यातूनच अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्यात वाढ होऊन दुपारनंतर पुन्हा एकदा शहरासह लगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रात्री उशिरा पुराचे पाणी ओसरल्याने व्यापारी काहीसे निर्धास्त झाले होते. मात्र, गुरुवारी सकाळपासून पावसाने जोर धरल्याने आलेल्या पुराने पुन्हा एकदा व्यापार्‍यांची त्रेधातिरपीट उडवली आहे.

दरम्यान, गत आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्येही अतिपर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यात जमीन खचण्याच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये नव्याने तयार करण्यात आलेला तारळ - चौके रस्ता खचला आहे. तर कणेरी-विखारेगोठणेकडे जाणारा रस्ताही खचला आहे. याच रस्त्यावरील कॉजवेला डोंगर येथे काही प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे त्यावरून गाड्या चालविणे धोक्याचे झाले असून, तारळ-चौके आणि विखारेगोठणे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पर्जन्यवृष्टीमध्ये कुंभवडे वाऊलवाडी येथील वसंत तुकाराम राघव यांच्या पडवीची भिंत कोसळून घराचे व पडवीचे अंशतः नुकसान झाले आहे तर कोंडतिवरे येथील श्रीकृष्ण गजानन पाध्ये यांच्या गोठ्यावर नारळाचे झाड मोडून पडल्याने नुकसान झाले आहे.