शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना सुरक्षित ठेवायचं आहे तर वाचाच...! - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

आज पालक आपल्या पाल्याच्या आरोग्यासाठी खूप जागरूक आहेत; पण तरीही काही प्रसंगी त्याला काही सुचत नसतं. त्या वेळेस त्याने ...

आज पालक आपल्या पाल्याच्या आरोग्यासाठी खूप जागरूक आहेत; पण तरीही काही प्रसंगी त्याला काही सुचत नसतं. त्या वेळेस त्याने आवर्जून आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. साधारणत: तीन दिवस ताप येत असेल, लघवी कमी होत असेल (डिहायड्रेशन म्हणजेच निर्जलीकरण) तर मूल सुस्त असेल किंवा सतत झोपत असेल तर, धाप लागत असेल किंवा श्वासाचा दर वाढत असेल, अंगावर चट्टे, पुरळ, डोळे लाल होणे, लाल ओठ, कधी आकडी आल्यासारखी होणे आणि क्वचित शुद्ध हरपल्यासारखी वाटली तर लगेच आपल्या डॉक्टरांना फोन करावा, त्यांच्याकडे न्यावे किंवा जवळच्या रुग्णालयात न्यावे. बी.सी.जी. व्रण लाल होणे, चिडचिडेपणा, सतत किरकिर करणे, रडणे, पोट दुखणे, जुलाब किंवा उलट्या होणे, हातावर सूज येणे अशी लक्षणे असू शकतात. सहसा मागील तीन महिन्यांत कोविड किंवा कोविड रुग्णांचा जवळून संपर्क आल्यास असा धोका मुलांना संभवतो. आपल्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क आपल्या मुलांना आरोग्यदायी कवच बहाल करते.

मुळात मुलांची प्रतिकारशक्ती उत्तम असते. त्यामुळे लगेच उपचार केले तर ९० टक्के, ९५ टक्के सौम्य संसर्ग होतो. तो लगेच आटोक्यातही येतो. अशा सौम्य लक्षणे असलेल्या मुलांना घरची मायेची ऊब केव्हाही त्याचं मन प्रफुल्लित ठेवते. म्हणून सौम्य कोविडची लक्षणे दिसताच डॉक्टरांना संपर्क करणे आवश्यक आहे, नव्हे कराच. सौम्य कोविडमध्ये मूल नॉर्मल दिसतं. मूल कमी खातं; पण खात-पीत असतं. श्वासाचा वेगही नॉर्मल असतो. वर जी लक्षणे मी सांगितली आहे, ती निव्वळ मुलाची ही अवस्था टाळावी यासाठी; कारण अशा मुलांना बाल कोविड रुग्णालयातच अ‍ॅडमिट करणे आवश्यक आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य शासनाने अशी रुग्णालये सुरू केली आहेत. रत्नागिरीत असेच महाराष्ट्रातील पहिले बाल कोविड रुग्णालय सुसज्ज केले आहे. मुलांची मानसिकता लक्षात ठेवून या बाल कोविड रुग्णालयाची सुंदर मांडणी केली आहे, ती अभिनंदनीय आहे. परंतु तशी अ‍ॅडमिट व्हायची वेळच येऊ नये यासाठीच आपण खबरदारी घेऊ या. मुलांना सुरक्षित करूया आणि घर आनंदी ठेवूया...!

(क्रमश:)