शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

फुणगूस आरोग्य केंद्र व्हेंटीलेटरवर

By admin | Updated: October 13, 2014 23:02 IST

रिक्त पदांचा प्रश्न : प्रशासनाची मनमानी

एजाज पटेल -फुणगूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह या आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रात गेली कित्येक वर्षे आवश्यक कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे आरोग्य केंद्रच व्हँटीलेटरवर आले आहे. वेळोवेळी रिक्त पदे भरण्याबाबत मागणी करुनही जिल्हा आरोग्य प्रशासनासह आजतागायत मूग गिळून गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.खाडी भागातील २० ते २५ गावांतील जनतेच्या मोफत रुग्णसेवेसाठी व औषधोपचारासाठी येथील आरोग्य केंद्र हे एकमेव हक्काचे साधन आहे. काही वर्षांपूर्वी हे आरोग्य केंद्र येथील व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे नेहमीच चर्चेत होते. मात्र, त्यानंतर सुरळीत व समाधानकारक कारभार चाललेला असताना जिल्हा प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे पुन्हा एकदा हे आरोग्य केंद्र वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.आरोग्य केंद्रात दोन कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची पाच महिन्यांपूर्वी जिल्हा बदली करण्यात आल्याने सध्या येथे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. तालुका तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य सेवा, कुटुंबकल्याण कॅम्प, उपकेंद्र फेऱ्या आदी आरोग्य केंद्रबाह्य कामे पाहावी लागतात. अशावेळी आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना हेलपाटे मारल्यानंतर खासगी दवाखान्यात जाण्याशिवाय पर्यायच राहात नाही.तीच तऱ्हा उपकेंद्रांचीही आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या पोचरी, मांजरे उपकेंद्राला तब्बल १० वर्षे मलेरिया कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या गावात उपकेंद्राच्या इमारती असूनही येथे मलेरिया कर्मचारी नसल्याने येथील लोकांना गावच्या ठिकाणी मिळणाऱ्या आरोग्य सेवेपासून व मार्गदर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. साधा ताप आला तरी १० ते १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अन्य खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी या आरोग्यकेंद्राचा वापर करता येतो. याबाबत येथील ग्रामस्थांनी अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या साऱ्या प्रकारामुळे कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारलेल्या आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारती रुग्णांअभावी ओस पडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.