शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST

फोटो कॅप्शन: जिल्हा पाेलीस दलातील सरकारी अभियोक्ता मेघना एस.नलावडे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.मोहीतकुमार गर्ग यांनी सन्मान केला. (छाया ...

फोटो कॅप्शन: जिल्हा पाेलीस दलातील सरकारी अभियोक्ता मेघना एस.नलावडे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.मोहीतकुमार गर्ग यांनी सन्मान केला. (छाया : तन्मय दाते)

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रत्नागिरी येथे फेब्रुवारी, २०२१ मध्ये उल्लेखनीय काम करणारे पोलीस अधिकारी, अंमलदार, तसेच पोलिसांना सहकार्य करणाऱ्यांचा जिल्हा पाेलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्याहस्ते प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा पाेलीस मुख्यालयात काेविडचे नियम पाळून या साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ‘फेम इंडिया मॅगझिन अ‍ॅन्ड एशिया पोस्ट’ या नियतकालिकेमध्ये फिफ्टी पॉप्युलर डिस्ट्रिक पोलीस कॅप्टन २०२१ मध्ये डॉ.मोहित कुमार गर्ग यांचा समावेश केल्याने रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर, गुन्ह्यातील शवविच्छेदन अहवाल तत्काळ देऊन पोलीस दलाला सहकार्य करणारे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.कुमरे, सरकारी पक्षाच्या बाजूने उत्तमरीत्या बाजू मांडल्याने दापोली पोलीस स्थानकातील गुन्ह्यांमधील आरोपी सचिन मिसाळ व अन्य आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा मिळवून देणाऱ्या सरकारी अभियोक्ता मेघना एस.नलावडे, तसेच पोलिसांना सहकार्य करून उत्कृष्ट काम करणाऱ्या शिरगावच्या पोलीस पाटील पूजा शिंदे आणि दाभोळ कार्यक्षेत्रामध्ये कोविड १९ मध्ये पोलीस दलाला सहकार्य करणाऱ्या १३ नागरिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस उपअधीक्षक (गृह) एस.एल. पाटील, सचिन बारी, शशिकिरण काशिद, निवास साळोखे, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांमधील प्रभारी अधिकारी उपस्थित होते.