शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगड तालुक्यात आरोग्य व्हेंटीलेटरवर

By admin | Updated: June 24, 2015 00:43 IST

रूग्णांची गैरसोय : दुर्लक्षात मात्र सातत्य

देव्हारे : मंडणगड तालुक्यातील तीन डॉक्टर सुट्टीवर गेल्याने आणि त्यांच्या जागी अन्य डॉक्टर्सची नियुक्ती न झाल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. तालुक्यातील आरोग्य विभागच सध्या व्हेंटीलेटरवर असल्याचे दृष्य पाहायला मिळत आहे. देव्हारे, कुंबळे, पणदेरी या महत्वाच्या ठिकाणची ही स्थिती असल्याने आरोग्य विभागाने या प्रकारात लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे. तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्सची पदे भरण्यात येत नाहीत, असलेले डॉक्टर्स विविध कारणांनी वेगवेगळ््या ठिकाणी जातात. आरोग्य सेवेतील या प्रकाराचा फटका परिसरातील रूग्णांना बसत आहे. या डॉक्टर्सचा भार अन्य डॉक्टर्सवर पडत असल्याने आरोग्य विभागाची अवस्था बिकट बनली आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ़ इनामदार, डॉ़ शेळके हे वर्षभर पुढील शिक्षणासाठी रजेवर गेले आहेत. त्यांच्या जागी कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पुंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुंबळे येथील डॉक्टरची नियुक्ती देव्हारे येथे झाल्याने कुंबळे येथील पद रिक्त आहे. पणदेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पद गेली बारा वर्षे रिक्त असून ते भरले जात नाही. तेथील डॉक्टर सुट्टीवर आहेत, असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या जागेवर डॉ. वलकर काम पहात आहेत़. देव्हारे येथील डॉक्टर सुट्टीवर गेल्यामुळे एकाच डॉक्टरवर कामाचा ताण पडत आहे़ आठवड्यातून दोन ते तीन दिवस शिबिरासाठी संबंधित डॉक्टर कुंबळे येथे जातात़ तर महिन्यातून दोन वेळा मिटींगसाठी रत्नागिरी येथे जावे लागते़ त्यामुळे शासकीय दवाखाना असूनही, रूग्णांना खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागत आहे. पणदेरी येथील आरोग्य केंद्रात असलेले डॉक्टर दीर्घकाळ सुट्टीवर असल्याने तेथील रूग्णांची गैरसोय होत आहे.मंडणगड तालुक्यातील या तिन्ही जागा रिक्त असून त्या जागा त्वरित भरण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून आमदार संजय कदम यांनी या विषयात लक्ष घालून रिक्त जागा त्वरित भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)