शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत

By admin | Updated: December 25, 2014 00:15 IST

फुणगूसची कथा : निकृष्ट बांधकामामुळे अख्ख्या कुटुंबांवरच टांगती तलवार...

फुणगूस : फुणगूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी असलेली निवासस्थानाची इमारत मृत्यूचा सापळा बनली आहे. खिळखिळ्या बनलेल्या निवासस्थान इमारतीत येथील कर्मचारीवर्ग स्वत:च्या कुटुंबासह येणारा प्रत्येक दिवस अक्षरश: जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तसेच आरोग्य केंद्रात सेवा देणारे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या वास्तव्यासाठी अन्य स्वतंत्र इमारत अशा दोन इमारती येथे आहेत. दोन्ही इमारती सुमारे ३० ते ३५ वर्षांच्या पुरातन आहेत. इमारतींची अतिशय दुर्दशा झाली असून, भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत.स्लॅबचा भागही निखळून पडू लागला आहे. स्लॅबमधील लोखंडी सळ्या दिसू लागल्या आहेत. पावसाळ्यात स्लॅबमधून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासासाठी असलेल्या इमारतीच्या दर्शनी भागाचा स्लॅब पूर्णपणे तुटून पडला होता. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली आहे. त्यानंतरही प्रशासन जागे झालेले नाही.या खिळखिळ्या इमारतीत येथील कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वत:च्या कुटुंबासह येणारा प्रत्येक दिवस जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. या इमारतींची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी वारंवार मागणी करण्यात आली. मात्र, वातानुकुलीत खोलीत आरामदायी खुर्च्यांवर बसणाऱ्या संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानी ही व्यथा जाऊनही ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरत आहे. (वार्ताहर)जीर्ण इमारतकर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या वास्तव्यासाठी अन्य इमारत अशा दोन इमारती.दोन्ही इमारती सुमारे ३० ते ३५ वर्षांच्या पुरातन.इमारतीच्या दर्शनी भागाचा स्लॅब पूर्णपणे तुटून पडल्याने कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत.दोन्ही इमारतींच्या छपराची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे. ही इमारत पडण्याच्या स्थितीत असताना त्याठिकाणी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सक्ती करणे कितपत योग्य? असा सवाल होत आहे. कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहाणे एकीकडे सक्तीचे केले असताना त्यांना देण्यात आलेल्या इमारतींचे काय? असा सवाल आता होत आहे.