शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन निर्णयानंतरही मुख्याध्यापक बदलीचा गोंधळ

By admin | Updated: July 10, 2016 01:46 IST

कृतीशून्य भूमिका : जिल्ह्यातील ७२ शाळांमध्ये गोंधळ

शिरगाव : रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्याध्यापक बदलीसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने निकालही दिला. आदेश असतानाही मुख्याध्यापकांचे बदलीबाबत कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्यांचे समुपदेशन हे २०१५-१६चे द्वितीय सत्रातच होणे गरजेचे होते. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषदेने कृतीशून्य भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील ७२ शाळांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात ५ जूनपूर्वीच बदल्यांची प्रक्रिया पार पडली. २०१४ साली आरटीईच्या नियमानुसार उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक नेमणुका पार पडल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेने २०१४ पासून ७२ शाळांमध्ये दोन मुख्याध्यापक देऊन वेगळा पायंडा पाडला आहे. निकषानुसार नवीन मुख्याध्यापक नियुक्तीनंतर जुन्या मुख्याध्यापकांनी पदभार सोडलेला नाही. यामुळे अनेक शाळेत जुना-नवा वाद निर्माण झाले आहेत. शिक्षकीपेशा प्रामाणिकपणे जपणाऱ्या सर्वांसाठीच ही गोंधळाची स्थिती असून, शिक्षक संघटनाही याबाबत गप्प असल्याने चिपळूण तालुक्यातील शिक्षक आश्चर्य व्यक्त करत आहेत. २०१४ साली झालेले समुपदेशन चुकीचे ठरत असेल तर त्याबाबतच्या कार्यवाहीला दोन वर्ष का लागत आहेत? शालेय प्रशासन सांभाळणारा मुख्याध्यापक पदवीधर असावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत संघटना गप्प का? शिक्षक पदवीधर व मुख्याध्यापक दहावी शिकलेला हे चित्र बदलणे गरजेचे आहे. दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकाने प्रशासकीय, विनंती बदल्यांमध्ये अपेक्षाभंगच सहन करायचा? आपले कुटुंबही कधी शहरात यावे, असे त्यांनी विचारातही आणायचे नाही का? असे अनेक प्रश्न शिक्षकांच्या मनात खदखदत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यापुरता मर्यादित व बहुचर्चित अशा मुख्याध्यापकांबाबतच्या शासन निर्णयानुसार ज्येष्ठ उपशिक्षकाला बाजूला करुन पात्र नसलेले मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत ठेवले जाणार असल्याने याबाबत तीव्र नाराजी पसरली आहे. (वार्ताहर)