शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी ‘त्या’ने उपलब्ध करून दिली माेफत रिक्षा सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : पेट्राेलच्या वाढत चाललेल्या दरामुळे आधीच रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे. तरीही लसीकरणासाठी वयाेवृद्धांची हाेणारी परवड ...

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : पेट्राेलच्या वाढत चाललेल्या दरामुळे आधीच रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे. तरीही लसीकरणासाठी वयाेवृद्धांची हाेणारी परवड लक्षात घेऊन त्यांच्यासाठी माेफत रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राजापूर शहरातील दशरथ दुधवडकर या तरुणाने हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे गरजू आणि वाहनांचे साधन नसलेल्या नागरिकांना माेठा आधार मिळाला आहे.

तालुक्यात माेठ्या प्रमाणात काेराेनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी तालुका आराेग्य विभागाचे प्रयत्न आहेत. आराेग्य उपकेंद्रांतर्गत लसीकरणाची माेहीम राबविण्यात येत आहे. राजापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयातही लसीकरणाची माेहीम सुरू आहे. शहरापासून ग्रामीण रुग्णालय दूर अंतरावर असल्याने आणि लाॅकडाऊनमुळे वाहनांची संख्या कमी असल्याने लसीकरण केंद्रावर पाेहाेचणे अवघड हाेत आहे. लस घेण्यासाठी जाणाऱ्या वयाेवृद्धांना चालत जाणे मुश्कील हाेत आहे. चढावातून चालत जाताना कधी थांबत, तर कधी सावलीचा आधार घेत वयाेवृद्ध लसीकरण केंद्रावर पाेहाेचत आहेत. वयाेवृद्धांचे हाेणारे हाल लक्षात घेऊन शहरातील तरुण दशरथ दुधवडकर याने वयाेवृद्धांसाठी माेफत रिक्षा सेवा देण्याचा निर्णय घेतला.

स्वत:चा रिक्षा व्यवसाय सांभाळून लसीकरणासाठी जाणाऱ्या वयाेवृद्धांसाठी त्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून माेफत रिक्षा सेवा पुरविण्याचा उपक्रम सुरू केला. ज्यांच्याकडे वाहने नाहीत, ज्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पाेहाेचण्यासाठी काेणताच आधार नाही, त्यांनी दशरथ दुधवडकर याला फाेन केला की, रिक्षा हजर हाेते. नागरिकाला लसीकरण केंद्रापर्यंत नेऊन पुन्हा घरी साेडण्याचे काम ताे करत आहे. दशरथ दुधवडकर याने यापूर्वी राजापूर नगर परिषदेत नगसेवक म्हणूनही काम बजावले आहे. त्यामुळे सामाजिक उपक्रमात सक्रिय असणाऱ्या दशरथने काेविड काळातही मदतीचा हात पुढे केला आहे. या उपक्रमामुळे अनेकांना आधार मिळाला असून, या उपक्रमाचे शहरवासीयांमधून काैतुक करण्यात येत आहे.

------------------------------

पेट्राेलचे दर खूप वाढले आहेत हे मान्य आहे. पण लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालयापर्यंत पाेहाेचण्यासाठी वयाेवृद्धांचे हाेणारे हाल न बघवणारे आहेत. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्याचे मी ठरवले. ज्येष्ठांना लसीकरण केंद्रापर्यंत नेण्यापासून ते घरी आणण्यापर्यंत त्यांना सेवा देत आहे.

- दशरथ दुधवडकर