शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात मदत स्वीकारतानाही 'हमरीतुमरी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:33 IST

चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर येथे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. या मदतीसाठी अनेक संस्था व राजकीय पक्ष सरसावले आहेत. ...

चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर येथे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. या मदतीसाठी अनेक संस्था व राजकीय पक्ष सरसावले आहेत. मात्र या मदतीचे वाटप करण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याने कोणाला अधिक मदत मिळत आहे, तर कोणाला अजिबात मदत मिळालेली नाही. ही मदत स्वीकारताना काही ठिकाणी हमरीतुमरीचे प्रकारही घडल्याचे समोर येत आहे. काही भागांत तर गाड्या अडवून मदत हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी (दि. २३) सकाळी पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही तासांतच पाणी, बिस्किटे व अन्य खाद्यपदार्थ घेऊन रत्नागिरी, दाभोळ, जयगड येथील कार्यकर्ते येथे दाखल झाले. तेव्हापासून आजतागायत ही मदत सर्व भागांतून पुरविली जात आहे. उलट दोन दिवसांत मदतीचा ओघ आणखी वाढला आहे; परंतु ही मदत पूरग्रस्तांना न मिळता भलतेच हिसकावून घेत आहेत. खरे तर पुरात सापडलेली कुटुंबे अजूनही साफसफाईच्या कामात गुंतून आहेत. तसेच रस्त्यावर मदत येत असल्याने अनेकजण मदत स्वीकारण्यास पुढे येत नाहीत; परंतु काहीजण पूरग्रस्त नसतानाही रस्त्यावर दिवसभर थांबून मदत आधीच लाटत आहेत.

सध्या बाजारपेठ उद‌्ध्वस्त झाल्याने सर्वांनाच मदतीची गरज भासत आहे. अनेकांकडे कपडे, धान्य असल्याने ते मदतीची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र मदत वाटपात सुसूत्रता नसल्याने आता मदत वाटपासाठी बाहेरून येणाऱ्यांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे ठरावीक भागातच मदत दिली जात आहे. त्यामुळे पुरामध्ये ज्यांचे नुकसान झालेले नाही ती पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरील माणसे रस्त्याच्या कडेला उभी राहून, गाड्या अडवून मदत सरळसरळ हिसकावून घेत आहेत, आपली घरे भरत आहेत. तर ज्यांचे घर आणि ऑफिस, दुकान पुराखाली गेले आहे त्या व्यक्ती आपले घर, दुकान साफ करीत आहेत. त्यांच्यापर्यंत खरोखरच मदत पोहोचत नाही. ते परिस्थितीशी झगडत आहेत, त्यांना कोणतीच जीवनोपयोगी मदत मिळत नाही; म्हणून ज्या बाहेरून येणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना मदत घेऊन येत आहेत, त्यांनी बाधित व्यक्तीच्या घरात जाऊन मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

..............................

रस्त्यावर आपली गाडी उभी करून मदत वाटू नये; कारण फार चुकीच्या पद्धतीने मदत दिली आणि घेतली जात आहे. पण जो खराेखर बाधित आहे, तो मात्र मदतीपासून वंचित आहे. त्यामुळे मदत देताना काळजी घेणे गरजेचे आहे.

- संजय चव्हाण, मराठा क्रांती मोर्चा, चिपळूण.

.....

मदतीसाठी आलेल्या गाड्यांना मज्जाव

येथील बाजारपेठेतील परकार कॉम्प्लेक्स परिसरात तीन गाड्या मंगळवारी मदत घेऊन आल्या होत्या. यावेळी या गाड्या धवलघाग सुपर बाजार येथे वाहतूक कोंडीत अडकल्या. यावेळी काहींनी धवल घाग येथील पार्किंगमध्ये मदतीच्या गाड्या सोडण्यास विनंती केली. मात्र तेथील सुरक्षारक्षकांनी वाहने आत सोडण्यास मज्जाव केला. यामुळे काही नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. अखेर तीन गाड्या आतमध्ये सोडण्यात आल्या.