शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची तीव्र औषधे आणि ‘प्रोटिनलाॅस’मुळे केस गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचा आजार झाल्यानंतर शरीरातील विविध प्रकारच्या जीवनसत्त्वांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो. रुग्णाच्या शरीराची हानी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाचा आजार झाल्यानंतर शरीरातील विविध प्रकारच्या जीवनसत्त्वांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो. रुग्णाच्या शरीराची हानी होते. त्यामुळे अशक्तपणा जाणवतोच. पण कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी तीव्र औषधे आणि प्रामुख्याने प्रथिनांसह अन्य जीवनसत्त्वांची होणारी हानी यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही जणांना केस गळण्याची समस्या सुरू होते.

कोरोनाच नव्हे तर कुठल्याही विषाणूशी लढताना रुग्णामधील विविध जीवनसत्त्वांची हानी होते. त्यातच कोरोनासारखा आजार फुफ्फुसावर आघात करतो. त्याच्यासाठी दीर्घकालीन उपाय घ्यावे लागतात. काही औषधे तीव्र स्वरूपाची असतात. ती दीर्घकाळ घ्यावी लागल्याने त्याचे प्रतिकूल परिणाम शरीराच्या इतर भागावर होतात. कोरोनाबाधित झालेल्या अनेक रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतरही या औषधांच्या माऱ्यामुळे अनेक त्रास होतात. कोरोनाशी लढा देताना शरीरातील विविध जीवनसत्त्वांचा नाश होतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती दुर्बल होते. विशेषत: प्रथिनांची हानी होते. त्यामुळे कोरोनातून बाहेर पडल्यानंतर अनेकांना केस गळणे, थकवा जाणवणे आदी त्रास होतात. यासाठी अधिक प्रथिने मिळतील असा आहार, भरपूर विश्रांती आणि भरपूर पाणी याची गरज आहे.

तीन महिन्यानंतर गळतात केस

कोरोनातून बरे झाल्यानंतर विविध जीवनसत्त्वांची हानी होत असल्याने तीन महिन्यानंतर काहींचे केस गळण्यास सुरुवात होते. प्रथिनांच्या ऱ्हासामुळे ही समस्या अधिक होते. त्यामुळे ही जीवनसत्त्वे नैसर्गिक घेतली तर उत्तम. पण अधिक प्रमाणात मिळण्यासाठी गोळ्या किंवा पावडरचा वापर करावा लागतो.

...................

हे करा...

शरीराला आलेला थकवा दूर होण्यासाठी परिपूर्ण आहाराची गरज.

प्रथिनयुक्त आहाराचा अधिकाधिक समावेश करावा.

आहारात अंडी, मोड आलेली कडधान्ये, साेयाबीन, दूध यांचा समावेश असावा.

क, ड आदी जीवनसत्त्वे मिळणेही गरजेचे असते. त्यादृष्टीने आहार घ्यावा.

कोरोनानंतरही खूप थकवा जाणवतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्यावी.

शरीराची पाण्याची पातळी राखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे

........................

आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा घरगुती उपाय...

- कोरोनातून बरे झाल्यानंतर कोरोनासाठी करण्यात येणाऱ्या उपचाराचा प्रतिकूल परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे शरीरातील विविध जीवनसत्त्वांचे प्रमाण घटते.

- कोरोनानंतर काही रुग्णांना यामुळे विलक्षण थकवा जाणवणे, श्वसनात अडसर, खाेकला आदी त्रास होत राहतात.

- काही जणांचे केस प्रथिने घटल्याने गळू लागतात. त्यामुळे काही जण तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्यासाठी घरगुती उपचार करतात.

- परंतु हे उपचारच काही वेळा घातक ठरतात. त्यामुळे या उपचारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

कोट

कोरोनाच नव्हे तर कुठल्याही विषाणूशी लढताना शरीरातील पोषक जीवनसत्त्वांची हानी होते. त्यामुळे कोरोनातून बाहेर पडल्यानंतर परिपूर्ण आहार घेणे गरजेचे आहे. विशेषत: प्रोटिनयुक्त आहार घ्यावा. तसेच भरपूर पाणी पिणे आणि विश्रांती घ्यावी.

- डाॅ. ज्ञानेश विटेकर, शल्य चिकित्सक, रत्नागिरी