शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

महिला शेतकरी गटातर्फे चिपळुणात कृतज्ञता भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:35 IST

- आपत्तीतील सहकार्यातून कृतज्ञता नि संस्कृतीचे दर्शन लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : सहकारातून सामुदायिक शेती करणाऱ्या वेहेळेतील प्रगती व ...

- आपत्तीतील सहकार्यातून कृतज्ञता नि संस्कृतीचे दर्शन

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : सहकारातून सामुदायिक शेती करणाऱ्या वेहेळेतील प्रगती व भाग्यश्री महिला शेतकरी गटाने चिपळुणातील पूरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य व अन्य साहित्याचे किट दिले. महिला शेतकरी गटाच्या या दातृत्वाचे कौतुक होत आहे.

चिपळूण तालुक्‍यातील वेहेळे-राजवीरवाडी येथे प्रगती व भाग्यश्री हे दोन महिला शेतकरी गट सहकारातून सामुदायिक शेती सेंद्रिय पद्धतीने करतात. गेल्या पाच वर्षांपासून येथील उत्पादित फळभाज्या या शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रालगतच्या प्रांगणात दलालमुक्‍त विक्री व्यवस्थेतून विकल्या जातात. शहरवासीयांनी या शेतमालाला उदंड प्रतिसाद दिला आहे. गटातील महिला शेतकऱ्यांच्या या कष्टाचे कौतुक प्रत्यक्ष शिवारफेरीच्या माध्यमातून चिपळूणवासीयांनी अनेकदा केले आहे. शहरवासीयांच्या संपूर्ण सहकार्यामुळेच दरवर्षीच्या रब्बी हंगामात या गटांनी अन्नपूर्णा शेती प्रकल्पाच्या माध्यमातून लक्षावधींची उलाढाल साधली.

जेव्हा महापुराने चिपळूणला वेढा दिला नि साऱ्यांचे अतोनात नुकसान केले. या वार्तेने या महिला शेतकरी अस्वस्थ झाल्या. ज्या शहरवासीयांनी आपल्या गटाला व्यवसायात सहकार्य केले, त्यांच्याप्रति या संकटात कृतज्ञता म्हणून काही काम करावे हा विचार पुढे आला. आपण या साऱ्या संकटात काहीतरी करायला हवे, या भावनेनं त्या कृतीशील झाल्या. पहिल्या दोन दिवसात त्यांनी शहरात पिण्याच्या पाण्याचे वितरण केले. त्यानंतर आपापल्या घरातील अन्नधान्य गोळा केले. त्यातून तांदूळ, लापशी यासह गहू, साड्या, सॅनिटरी पॅड अशा साहित्याचे पॅकेट्स करून ते गटाच्या गाडीतून पेठमाप गणेशवाडी येथील ५० कुटुंबीयांसाठी ही जीवनावश्यक साहित्य पॅकेट्स देण्यात आली.

या संवेदनशील उपक्रमातील वितरणप्रसंगी शुभांगी राजवीर, श्रुती राजवीर, अरुणा राजवीर, संध्या राजवीर, जयश्री राजवीर, गणेश घाणेकर यांच्यासह प्रगती व भाग्यश्री महिला शेतकरी गटाच्या सदस्य-पदाधिकारी उपस्थित होत्या.