शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

दर्जा टिकवण्यात ग्रामपंचायती अपयशी

By admin | Updated: November 11, 2014 23:24 IST

पाचल विभाग : स्वच्छता मोहीम राबतेय फक्त अभियानापुरतीच

पाचल : पाचल विभागातील निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती आपला दर्जा टिकविण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ व सुंदर गाव अभिनव कल्पना वापरुन संपूर्ण भारत स्वच्छ ठेवण्याचे अभियान राबवले गेले. ज्या ग्रामपंचायतीने या अभियानात भाग घेऊन आपला गाव स्वच्छ व सुंदर केला, त्या ग्रामपंचायतीना शासनाच्यावतीने निर्मल ग्राम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ग्रामस्वच्छता अभियान राबवताना अटी व शर्ती घालून स्वच्छता अभियानाची नियमावली तयार करण्यात आली होती. यास बांधील राहून ग्रामपंचायत आपल्या परीने कामकाज करत होती. सर्वप्रथम हगणदारी मुक्त गाव व्हावा म्हणून जिथे कुटुंब तिथे शौचालय बांधून त्याचा वापर नियमीत करावा. घर, घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवताना इतरही परिसर स्वच्छ ठेवण्यास ग्रामस्थांना प्रवृत्त करुन गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत होते. गावात असलेले पाणवठे, सार्वजनिक विहिरी तसेच वैयक्तीक विहिरी, जलशुद्धीकरण करुन आरोग्याच्या हितावह पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु हेच सातत्य राखण्यास ग्रामपंचायती अपयशी ठरल्याचे दिसून येते.राजापूर तालुक्यात आजही हजारो कुटुंब शौचालयाविना असून, तशी दप्तरी नोंद दिसून येते. काही कुटुंब शौचालय असूनसुद्धा उघड्यावर बसलेली दिसतात. हगणदारी मुक्ती करत असताना उघड्यावर शौचाला बसणे कायद्याने गुन्हा ठरविला असून, अशी कोणीही व्यक्ती दिसली तर दंड करुन दाखवणाऱ्यास बक्षीस म्हणून दिली जाते. आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये कुठेही दंड केलेली व्यक्ती दिसून येत नाही. परंतु शौचाची दुर्गंधी मात्र परिसरात आढळून येते, तर काही ग्रामपंचायतींचे आवारही स्वच्छ दिसत नाहीत. ग्रामस्वच्छता अभियानाचे क्षणिक सुख घेऊन त्याकडे नंतर ग्रामपंचायतीनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे तालुक्यातील संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली असल्याचे पाहायला मिळते आहे. निर्मल ग्रामपुरस्कारासाठी जसे काम झाले तसे काम सतत त्या भागात व्हावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)