शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

केशरी रेशनकार्डधारकांना विनाअट धान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST

पाचल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व केशरी रेशनकार्डधारकांना विनाअट धान्य पुरवठा करण्याची मागणी कोकण विकास आघाडीचे तालुका संघटक सुरेश गुडेकर ...

पाचल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व केशरी रेशनकार्डधारकांना विनाअट धान्य पुरवठा करण्याची मागणी कोकण विकास आघाडीचे तालुका संघटक सुरेश गुडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केशरी रेशनकार्डधारकांना प्रतिव्यक्ती ठरावीक धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार त्यांना काही ठरावीक दराने फक्त दोन महिने धान्य पुरवठा करण्यात आला. त्यानंतर केशरी रेशनकार्डधारकांचा धान्यपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे केशरी रेशनकार्डधारकांमधून कमालीचा संताप तथा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ज्या केशरी रेशनकार्डधारकांचे उत्पन्न ४९ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा रेशनकार्डधारकांना धान्य दिले जात नाही. त्यामुळे केशरी रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित आहेत. केशरीकार्डधारकांसाठी असलेली उत्पन्नाची अट त्वरित र­द्द करून सर्व केशरी रेशनकार्डधारकांना विनाअट धान्य पुरवठा करण्याची मागणी सुरेश गुडेकर यांनी केली आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी दारिद्र्यरेषेखालील लोकांना पिवळी रेशनकार्ड देण्यात आली होती. या कालावधीत लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यासाठी शासन स्तरावर किती प्रयत्न झाले हा वादातीत मुद्दा आहे. पूर्वी ज्याच्याकडे रेशनकार्ड होती, त्यापैकी सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे आदींना वगळून उर्वरितांची कार्ड केशरी म्हणून ठेवण्यात आली. मात्र, त्यावेळी विशिष्ट अशा उत्पन्नाची अट ठेवण्यात आली नव्हती. त्यावेळी हे सर्व केशरी रेशनकार्डधारक किरकोळ व्यवसायधारक व मोठी शेतीधारक होते. मात्र, त्यानंतरच्या एका शासन निर्णयानुसार या उत्पन्नधारकांना रुपये ४९ हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली होती. त्यामुळे दहा वर्षे या केशरी कार्डधारकांचे धान्य बंद झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे बहुसंख्य केशरी रेशनकार्डधारक त्यांचे छोटे व्यवसाय बंद करून घरी बसले आहेत. त्यांच्या उत्पन्नाचे साधन बंद झाल्याने खुल्या बाजारातील महागडे अन्न-धान्य घेणे त्यांना परवडत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्याजवळ असणाऱ्या केशरीकार्डचा आधार वाटत होता; परंतु उत्पन्नाची अट घातल्याने त्यांना धान्य नाकारले जात आहे. अशा परिस्थितीत घरी राहून कसे जगावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी केशरी रेशनकार्डधारकांना लावलेली उत्पन्नाची अट त्वरित काढून शासनाने सर्व केशरी कार्डधारकांना धान्य पुरवठा करण्याची मागणी सुरेश गुडेकर यांनी केली आहे.