शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उत्खननात ५0 टक्के द्या

By admin | Updated: February 27, 2015 23:18 IST

चिपळूण पालिका : गौण खनिज वाहतुकीसाठी शहराचा वापर

चिपळूण : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असते. वाळू उपसाही होत असतो. मात्र, त्याची वाहतूक ही नगर परिषदेच्या रस्त्यावरुन होत असते. त्यामुळे रस्त्यांना खड्डे पडत आहेत. या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी नगर प्रशासनाला खर्च करावा लागतो. त्यामुळे गौण खनिजापासून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ५० टक्के उत्पन्न हे नगर परिषदेस मिळावे, असा ठराव शासन स्तरावर पाठवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर परिषदेच्या उत्पन्नात कोणकोणत्या उपाययोजनेनुसार भर पडेल या अनुषंगाने २०१५-१६ चे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकात गौण खनिज उत्खननाबाबत चर्चा झाली. शहरातील शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांच्या भाड्यांची वसुली दर महिना होणे आवश्यक आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या भाजी मंडई, मटण मच्छीमार्केटबाबतचे काम पूर्ण करुन त्याचे मूल्यांकन करण्याची कार्यवाही तातडीने करुन नगर परिषदेचे उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने गाळे वितरित करण्याची कार्यवाही करावी, असेही सुचित करण्यात आले आहे. शहरातील मोबाईल टॉवरचे सर्वेक्षण करून त्यावर कर आकारणी करण्यात यावी. व्यायाम शाळा चालवण्याकरिता अंदाजे वार्षिक खर्च २ लाख ५० हजार इतका आहे. व्यायाम शाळेपासून वार्षिक जमा अंदाजे ३० ते ३५ हजार आहे. त्यामुळे व्यायामशाळा फीमध्ये ३०० रुपये वाढ करण्यात यावी. जीमबाबत धोरणात्मक निर्णय कौन्सिलसमोर ठेवण्यात यावा अशी चर्चा झाली. अण्णासाहेब क्रीडा संकूल लवकरात लवकर चालू करुन ते सुरु करण्यात यावे. या ठिकाणी व्यावसायिक क्रीडा स्पर्धा प्रतिदिन २ हजार रुपये, विवाह समारंभ १० हजार रूपये, राजकीय कार्यक्रम ५ हजार रूपये व अन्य कार्यक्रमांसाठी ४ हजार रूपये घेण्यात यावे जेणेकरून यामधून ५ लाखांचे उत्पन्न वाढू शकेल. इमारतींना परवानगी देताना विकास करामध्ये या अंदाजपत्रकात वाढ करण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी दूर होण्याच्यादृष्टीने पालिकेच्या आरक्षण ठिकाणी जागेमध्ये पे अ‍ॅण्ड पार्क सुविधा करण्याबाबतही चर्चा झाली. पूर्वीच्या जाहिरात करातही वाढ करण्यात आली आहे. इमारत परवानगी, व्यवसाय ना हरकत दाखला यांच्या फीमध्ये वाढ केल्यास नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. चालू वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. (वार्ताहर)