शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक वनीकरणच्या अधिकाऱ्याकडूनच शेतकऱ्याला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील अडरे येथील रोपवाटिका मालक शेतकरी सुभाष धोंडू कदम यांच्याकडून सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तालुक्यातील अडरे येथील रोपवाटिका मालक शेतकरी सुभाष धोंडू कदम यांच्याकडून सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी २,२०० रोपे विकत घेतली. परंतु, अद्याप त्याचे पैसे अदा केलेले नाहीत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सामाजिक वनीकरण विभाग, चिपळूण कार्यालयातील लागवड अधिकारी बनसोडे व वनपाल पवार यांनी ५ मार्च २०२१ रोजी कदम यांच्या खासगी रोपवाटिकेतून साग १,२००, बांबू २३०, जांभूळ, काशिद, चिंच, खैर, काजू व अन्य मिश्र रोपे मिळून ७७० अशी एकूण २,२०० रोपे पिंपळी येथील शासकीय नर्सरीत नेली. पिंपळी येथे नर्सरीत ही रोपे उतरविण्यात आली. या रोपांची २५ हजार रुपये किंमत आहे. मात्र, रोपे नेवून पाच महिने झाले तरी ही रक्कम कदम यांना मिळालेली नाही. आपल्याला रोपांचे बिल मिळावे, यासाठी कदम सातत्याने बनसोडे व पवार यांच्या संपर्कात राहिले व वारंवार बिलाबाबत मागणी केली. परंतु, संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता तर कदम यांचा भ्रमणध्वनी उचलणेही बंद केले असल्याने आपले पैसे देण्याची या अधिकाऱ्यांची मानसिकता नसल्याने कदम हतबल झाले आहेत.

कोरोनामुळे गेली दीड वर्ष अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत. सामान्य माणसाला जगणे अवघड झाले आहे. अशातच काहीतरी उद्योग करणाऱ्यांना अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अतिशय कष्टाने कदम यांनी उन्हाळ्यात मुलाप्रमाणे संगोपन करून रोपवाटिका तयार केली. कष्ट केले पण तयार केलेली रोपे सामाजिक वनीकरणच्या अधिकाऱ्यांनी विकत घेऊनही त्याचे अद्याप पैसे न दिल्याने व संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व आपली रक्कम आपल्याला मिळावी, अशी मागणी कदम यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.