शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गायकवाड यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

भाडे माफ करण्याची मागणी राजापूर : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने एस. टी. वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे भाडेतत्वावर असलेल्या व्यावसायिकांना याचा ...

भाडे माफ करण्याची मागणी

राजापूर : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने एस. टी. वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे भाडेतत्वावर असलेल्या व्यावसायिकांना याचा आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळाने दुकानांचे भाडे माफ करावे, अशी मागणी या व्यावसायिकांतून होत आहे.

धामणवणेत वृक्षारोपण

चिपळूण : तालुक्यातील धामणवणे ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर यांच्या हस्ते रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी नीलेश शेंबेकर, उद्योजक शिरीष चौधरी, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते शिवाजी शिंदे, सुभाष जाधव, ग्रामपंचायत सदस्य रियाज सावंत उपस्थित होते.

बिले भरण्याची मागणी

दापोली : खासगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेणाऱ्या गरीब शेतकऱ्यांची वैद्यकीय बिले शासनाने भरावीत, अशी मागणी माजी आमदार संजय कदम यांनी केली आहे. तहसीलदार वैशाली पाटील यांना त्यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. उपजिल्हा रुग्णालयात बेड कमी असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.

वाहतूक कोंडी

चिपळूण : बहादूरशेख नाक्यावरील चौकात चिपळूण - कऱ्हाड मार्गावर पाईपलाईनसाठी खोदलेला खड्डा गेले दोन महिने जैसे थे परिस्थितीत आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील पाण्याच्या पाईपलाईनसाठी हे खोदकाम करण्यात आले आहे.

सोलर यंत्रणेचे नुकसान

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या इमारतीवर बसविण्यात आलेल्या सोलर विद्युत संचाच्या चौदा पॅनलसह अन्य साहित्याचे तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प सुरु करण्यात येणार असून, दरवर्षी काही लाख वीजबिलांच्या रकमेची बचत होणार आहे.

रस्त्याची दुरवस्था

दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथील पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. यासाठी उभानगर येथील रस्त्यावर काढलेले खड्डे योग्य पद्धतीने न बुजविल्यामुळे वाहनचालकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रस्ते निकृष्ट झाले असून, वाहनांची चाके खड्ड्यात फसत आहेत. त्यामुळे वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

वर्धापन दिन साजरा

दापोली : न. का. वराडकर कला, रा. वि. बेलोसे वाणिज्य, कै. शांतीलाल जैन विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. प्राचार्य डॉ. सुरेश निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या अध्यक्ष जानकी बेलोसे, सुनीता बेलोसे यावेळी उपस्थित होत्या.

महासंघाचे निवेदन

दापोली : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या दापोली शाखेतर्फे पदोन्नती आरक्षणाच्या संविधानिक न्याय मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शासनाची पदोन्नतीच्या कोट्यातील ३३ टक्के पदे रिक्त आहेत. खुल्या वर्गातील पदे सेवाज्येष्ठतेच्या नियमानुसार भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सेंद्रिय भात लागवड

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी विद्या विभागांतर्गत सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी ‘सेंद्रिय भात लागवड व उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर एकदिवसीय प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विभागप्रमुख डॉ. प्रशांत बोडके यांनी मार्गदर्शन केले.