शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

‘गंधर्वस्वरां’चा सुगंध पुन्हा दरवळणार!

By admin | Updated: October 26, 2016 00:14 IST

रत्नागिरीत कार्यक्रम : जयतीर्थ मेवुंडी, शौनक अभिषेकी यांची संगीत मैफल

रत्नागिरी : वेगवेगळ्या अनवट वाटांनी, आपल्या प्रतिभेचा अविष्कार सादर करून स्वत:चं एक जणू स्वयंप्रज्ञ घराणंच घडवणाऱ्या समर्थ भारतीय शास्त्रीय संगीत गायक पं. कुमार गंधर्वांच्या गायनशैलीचा सुगंध रत्नागिरीत पुन्हा एकदा दरवळणार आहे. पंडितजींची तिसरी पिढी, अर्थात त्यांचे नातू भुवनेश कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाचा आनंद रत्नागिरीकरांना दिवाळीनिमित्त घेता येणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांनी दिली. यापूर्वी जयतीर्थ मेवुंडी व शौनक अभिषेकी यांच्या संगीतमैफलीचा आनंद रसिकांनी घेतला आहे, अशी त्यांनी आठवण करून दिली. समृद्ध सांगितीक वारसा लाभलेल्या घरात जन्मलेले भुवनेश हे साहजिकच सुरांच्या साथीनेच लहानाचे मोठे झाले. लहानपणी जाणीवपूर्वक ऐकण्यासाठी त्यांना वेगळा असा वेळ द्यावाच लागला नाही. त्यांच्या लहानपणीच्या स्मृतींमध्ये पहाट, माध्यान्ह, सायंकाळ, रात्री अशा सर्व वेळी ऐकलेले विविध राग, रियाझ, ध्वनीमुद्रण यांचीच मुबलकता आहे. वसुंधरा कोमकली आणि मधुप मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. हळूहळू त्यांना जाणवत गेले की, आपले आजोबा म्हणजे संगीताचा एक ज्ञानकोषच! तो वारसा आपण प्राणपणाने जपला पाहिजे. ह्या जाणिवेला भुवनेश कोमकलीनी जोड दिली ती अखंड रियाझ आणि सतत नवीन शिकण्याच्या वृत्तीची! गायनाची मैफल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीतर्फे दिवाळीनिमित्त आयोजित केली आहे. ही मैफल रविवार, ३० आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता खातू नाट्यमंदिर येथे आयोजित केली आहे. या सुसंधीचा लाभ रत्नागिरीतील रसिकांनी घ्यावा आणि दिवाळी सण संगीतमय करावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, कार्यवाह अ‍ॅड. प्राची जोशी आणि कै. यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीचे अध्यक्ष आनंद देसाई यांनी केले आहे. (प्रतिनिधी) ४भुवनेश कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाचा आनंद घेता येणार. ४भुवनेश हे सुरांच्या साथीनेच लहानाचे मोठे झाले.