शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात पाच तपासणी नाके : डाॅ. बी. एन. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:38 IST

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांनी सुरक्षित जिल्ह्यात यावे, यासाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात पाच ...

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांनी सुरक्षित जिल्ह्यात यावे, यासाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात पाच प्रवेश नाके निश्चित करण्यात आले आहेत. तेथे कोरोना चाचणी होणार नाही. केवळ प्रवाशांची सविस्तर माहिती नोंदविली जाणार आहे. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्हीही डोस घेतलेले नसतील किंवा कोरोना चाचणी केलेली नसेल, अशांची मुक्कामी पोहोचल्यानंतर आरटीपीसीआर अथवा अँटिजन चाचणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मंगळवारी जिल्ह्यात ४,८८७ लोक दाखल झाले असून, त्यात केवळ सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) राजश्री मोरे आदी उपस्थित होते.

आतापर्यंत जिल्ह्यात ४,८८७ नागरिक विविध मार्गांनी आले आहेत. त्यापैकी १,७७३ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असून १,२७८ जणांनी अँटिजन तर १,८२२ जणांनी आरटीपीसीआर चाचणी केली आहे. उर्वरित केवळ १४ जणांचीच चाचणी करावी लागली. यात ६ जण पाॅझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी या वेळी दिली.

ते पुढे म्हणाले, लोकांमध्ये आता जागरूकता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुतांशी नागरिक तयारीनिशी येत असून, लसीचे दोन्हीही डोस घेऊन किंवा आधीच कोरोना चाचणी करून घेत आहेत. त्यामुळे गावी येणाऱ्यांपैकी केवळ ५ ते ६ टक्के लोकांचीच चाचणी करावी लागत आहे. लोकांनाही आपल्या घरच्यांची किंवा आप्तांची काळजी असल्याने चाचणीसाठी त्यांचा कुठलाही विराेध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

गावांमध्ये किंवा शहरांमध्ये कृती दले कार्यरत झाली असून, गावाेगावी सर्वेक्षण सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे गावी आलेल्यांनी डोस घेतले आहेत का, कोरोना चाचणी झाली आहे का, याची माहिती घेतली जात आहे. चाचणी न केलेल्यांची आरटीपीसीआर स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे. चाचणीसाठी मोबाइल आरोग्य पथके कार्यरत आहेत. लक्षणे असतील त्यांनाच विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन तिसऱ्या लाटेशी सामना करण्याची तयारी करीत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कुणाला त्रास देण्यासाठी नाही, तर लोकांना सुरक्षित ठेवून सर्व सण साजरे व्हावेत, या उद्देशाने लोकसहभागाने प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. त्यामुळे यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोना चाचणी सुविधा

गावी येण्यापूर्वी प्रवास करण्याआधी चाचणी करता यावी यासाठी बस स्थानके आणि रेल्वे स्थानकांवर कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत असून, लोक चाचणीसाठी रांगेत उभे राहत आहेत.

घाटांमध्ये सूचना फलक

महाड ते राजापूर या मार्गावरील आठ घाटांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडून दिशादर्शक फ्लेक्स लावण्यात येत आहेत. हे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम दोन दिवसांत पूर्ण होईल. तसेच महामार्गावरील झाडी, गवत तोडण्यात येत आहे. या ठिकाणी क्रेन, टोईंग व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.